स्वादुपिंडावरील सूज कशामुळे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार | पुढारी

स्वादुपिंडावरील सूज कशामुळे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

डॉ. मनोज शिंगाडे

स्वादुपिंड म्हणजे पनक्रिआज. यावरून सुजेचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. त्यापैकी सर्वाधिक जास्त लोकांमध्ये आढळणारा प्रकार म्हणजे अ‍ॅक्युट पॅनक्रिअटायटीस हा होय. बहुतेक रुग्णांमध्ये हा अ‍ॅक्युट पॅनक्रियाटायटीस गॉल ग्बायडरमधील खड्यांमुळे किंवा अधिक मद्यसेवनामुळे होतो. तसेच विषाणूंचा जंतूसंसर्ग, स्वादुपिंडामधील गाठी, शरीरातील अधिक वाढलेले ट्रायग्लिसराईड किंवा कोलेस्ट्रॉल, पोटातील शस्त्रक्रिया किंवा निरनिराळ्या प्रकारची काही औषधे, यामुळे हा आजार होतो. हा आजार तसा गंभीर स्वरूपाचा असून आजार झाल्यानंतर मृत्यू पडणार्‍यांचे प्रमाण 30 ते 50 टक्के एवढे आहे.

पॅनक्रियाटायटीस या आजाराची तपासणी करण्यासाठी प्रयागशाळेत रक्तचाचणी केली जाते. या चाचणीत रक्तातील पेशींच्या मोजमापनात पांढर्‍या रक्तपेशींचे प्रमाण एक घनमिलिमिटरला 15 हजारपेक्षा जास्त आढळतो. या व्यतिरिक्त रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झालेले असते तसेच लाल रक्तपेशींची संख्याही कमी झालेली आढळते.

अतिशय गुंतागुंतीचा हा आजार असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही 200 ते 500 मिलिग्रॅम इतक्या प्रमाणात वाढते. रक्तातील कॅल्शियमचे प्रमाणही कमी झालेले असते आणि एसजीओटी व एसजीपीटी यांचे प्रमाण शंभर मिनिटांपेक्षा वाढलेले दिसते. या सर्व तपासण्या या आजाराचे निदान करण्यासाठी गरजेच्या असल्या तरीही हा आजार अचूकपणे ओळखण्यासाठी महत्त्वाची चाचणी म्हणजे रक्तातील अमायलेज, लायपेज हे एन्झाईम सर्वात प्रथम वाढते. त्याची पातळी 500 ते 5000 युनिट इतकी वाढण्याची शक्यता असते.

या आजारात सुरुवातीला पोटात दुखायला लागते. त्यानंतर 24 तासांनी लायपेजचे प्रमाण वाढत जाते. ते एक हजार युनिटपेक्षा जास्त वाढू शकते. ही वाढ सात ते दहा दिवस कायम राहते. काही वेळेला काही रुग्णांमध्ये बिलीरुबीनचीही तपासणी केली जाते. कारण ते वाढलेले आढळते. तसेच काही विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन्सचेही प्रमाण वाढते. प्रयोगशाळेतील या या रक्त तपासण्यांबरोबरच सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि एन्डोस्कोपीक सोनोग्राफी (दुर्बिणीद्वारे तपासणी) यासारख्या चाचण्यादेखील अतिशय फायदेशीर ठरतात. या आजाराचे निदान जेवढे लवकर होईल तेवढे उपचार करणे आणि रुग्ण वाचवणे सोपे असते.

Back to top button