कार्तिकी यात्रेनिमित्त नाशिक महामार्ग दिंडीमय | पुढारी

कार्तिकी यात्रेनिमित्त नाशिक महामार्ग दिंडीमय

मंचर : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त विविध भागातील पायी दिंड्या आणि पालख्या आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे पुणे -नाशिक महामार्ग वारकर्‍यांनी फुलून गेला आहे. संत ज्ञानोबा, तुकाराम, नामदेवांचा जयघोष करत खांद्यावर भागवत धर्माची पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ऐन थंडीत वारकर्यांची पावले आळंदीच्या दिशेने चालू लागली आहेत. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. मंचर येथे जुना पुणे- नाशिक महामार्ग तसेच बाह्यवळण महामार्ग पायी दिंडी सोहळ्यामुळे00 भक्तिमय झाल्याचे चित्र आहे.

दिंडीतील भाविकांना हॉटेल तसेच इतर व्यावसायिक व परिसरातील भाविकांकडून घरी बोलावून जेवणावळींसह, नाश्त्याची सोय केली जात आहे. कित्येक ठिकाणी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत दिंड्यांचे स्वागत केले जात आहे. दिंडीत सहभागी भाविक भक्तांना दुधाचे वाटप व चहा-पाण्याची सोय केली जात आहे. कळंब आणि एकलहरे गावात कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांकडून मुक्कामी दिंड्यांची जेवणाची व नाश्त्याची सोय करीत आहेत. आळंदी यात्रेनिमित्त एकलहरे या ठिकाणी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कीर्तनाची परंपरा उद्योजक रामदास डोके यांच्या माध्यमातून अबाधितपणे चालू आहे.

हेही वाचा :

Back to top button