Latest

Jalgaon Crime News | ‘मुलांना रेल्वे पटरीवर फेकून देईन’! म्हणत त्याने तिच्यावर केला अत्याचार

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या ३३ वर्षीय विवाहितेला तिच्या मुलांना मारण्याची धमकी देऊन भुसावळ शहरातील सुरभी लॉज येथे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार (दि.९) रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हनुमान नगरातील एका भागात ३३ वर्षीय महिला मुलांसह वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ दरम्यान महिलेला तिच्या मुलांना रेल्वे पटरीवर फेकून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. संशयित आरोपी विनोद इंगळे (रा. उचंदा ता. मुक्ताईनगर) याने ही धमकी महिलेला देत तिच्यावर भुसावळ शहरातील सुरभी लॉज आणि खडका चौफुली येथे वेळोवेळी अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार गुरुवार (दि.९) रोजी समोर आला आहे. अत्याचारामुळे महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयित आरोपी विनोद इंगळे याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT