Latest

Jalgaon Crime : जळगाव शहरातून तिघा गुन्हेगारांची टोळी हद्दपार

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; जळगाव शहरातून तिघा गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (वय १९) निशांत प्रताप चौधरी (वय १९, दोन्ही रा. शंकर आप्पा नगर) आणि कुणाल उर्फ दुंडया किरण कोळी (वय-१९, रा. कुसुंबा) हे तिघेही शहरात टोळीने गुन्हे करत असल्याने त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तिघांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

स्वप्निल उर्फ गोलू ठाकूर याच्यासह साथीदार निशांत चौधरी व कुणाल उर्फ दुंड्या कोळी यांच्याविरुद्ध एमआयडीसी व रामानंदनगर पोलीस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अश्लिल शिवीगाळ करणे, घातक हत्याऱ्याने दुखापत, दमबाजी करणे असे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे त्यांनी टोळीने केले आहेत. ही टोळी शहरात दहशत पसरवित असून त्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. तसेच शहरात सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही.

त्यामुळे टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सफौ अतुल वंजारी, पोना सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, मपोकॉ निलोफर सैययद यांनी तयार करुन तो जिल्हा पोलीस अधीक्षक याच्याकडे पाठविला होता. चौकशीनंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तीनही गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी काढले आहे. या हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी पाहिले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT