जळगाव : भुसावळ शहरात काही दिवसापूर्वी बायोडिझेल वाहतुकीवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी बायोडिझेलच्या वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली होती. या प्रकरणात एलसीबीने बायोडिझेलचा टँकर पकडून बाजारपेठ पोलिसांकडे दिला होता. यात तक्रारदाराच्या मित्रास सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात ५ लाखांची मागणी करण्यात आली. त्यापैकी सुरूवातीला तीन लाख रुपये रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड, पोलीस नाईक तुषार पाटील, खाजगी व्यक्ती ऋषी शुक्ला यांना लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी केली.
हेही वाचा :