Latest

ISRO Space Station: ‘स्पेस स्टेशन’ संदर्भात इस्रो अध्यक्षांचा मोठ्या योजनेचा खुलासा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) महत्त्वाकांक्षी अंतराळ संशोधन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी CGTN ला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. एस. सोमनाथ यांनी भारत 'स्पेस स्टेशन' बनवणार असल्याची योजना असल्याचा खुलासा केला आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.  (ISRO Space Station)

मुलाखतीत बोलताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, भारताची स्पेस एजन्सी भविष्यातील मोहिमांसाठी विविध शक्यतांचा शोध घेत आहे. यामध्ये स्पेस स्टेशनचे बांधकाम आणि दीर्घकालीन मानवी अंतराळ उड्डाण यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्र मोहिमेच्या यशानंतर आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. याठिकाणी आम्ही कोणते सायन्स वापरले जाऊ शकते हे पाहत आहोते. तसेच हे 'स्पेस स्टेशन' (अंतराळ स्थानक) भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेला कसे फायदेशीर ठरेल, याचा देखील अभ्यास केला जात, असल्याचे इस्रोच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. (ISRO Space Station)

चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी लँडिंगनंतर यामधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने देखील चंद्रावर त्यांचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले. यामुळे भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षांना चालना मिळाली आहे. या यशानंतर आता या यशानंतर, इस्रो आता गगनयान कार्यक्रमाद्वारे मानवी अंतराळ उड्डाण क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचे आहे, जे स्पेस स्टेशनच्या निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असेही इस्रो अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी मुसाखतीदरम्यान सांगितले. (ISRO Space Station)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT