Latest

ISRO Aditya L1 Mission: ब्रेकिंग! इस्रोची ऐतिहासिक झेप! ‘आदित्य एल-१’ लॅग्रेंज पॉईंट-१ (L1) वर यशस्वी पोहचले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: Aditya-L1 – Spacecraft भारतीय अवकाश संशोधनासाठी आज (दि.६) महत्त्वाचा दिवस आहे. भारताचे सूर्ययान 'आदित्य एल-१' ने लॅग्रेंज पॉईंट१ (L1) वर ऐतिहासिक झेप घेतली आहे. हा टप्पा पृथ्वी आणि सूर्याच्या गुरूत्त्वाकर्षणात असलेल्या L1 पॉईंटवर येते. या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) वर सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल समान आहे. त्यामुळे L1 हा पॉईंट निवडण्यात आला आहे. या मोहीमेच्या यशामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि भारताने अवकाश संशोधनात नवीन इतिहास रचला आहे. (ISRO Aditya L1 Mission Updates)

लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) वर सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण समान

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये एकूण ५ लॅगरेंज पॉईंट आहेत. दरम्यान पृथ्वी आणि सूर्यामधील L1 वर गुरुत्वाकर्षण स्थीर आहे. त्यामुळे  एल-वन म्हणजेच लॅन्जेरियन पॉइंट हे असे ठिकाण ठिकाण निवडण्यात आले आहे की, तिथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल समान आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी देखील एल-वनमधून सूर्य दिसू शकतो. त्यामुळेच आदित्य एल-१ हे अंतराळयान स्थिर ठेवण्यासाठी पृथ्वी आणि सूर्याच्या मधील एल-१ पॉइंट निवडण्यात आला आहे. २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित झाल्यापासून, आदित्य एल-वनला चार वेळा पृथ्वीच्या वेगवेगळ्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आज ११० दिवसांनी आदित्य एल-१ ला फायनल हॅलोजन कक्षेत पाठवण्यासाठी फायर केले जाणार आहे, त्यानंतर ते 'लॅगरेंज पॉईंट१' वर स्थिरावले जाणार आहे, ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास भारताला सूर्यमोहीमेत मोठे यश मिळणार आहे. सौर वातावरणाचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. (ISRO Aditya L1 Mission Updates)

काय आहेत मोहिमेची उद्दिष्टे

आदित्य एल १ केवळ एक अंतराळ यान किंवा सूर्याभोवती फिरणारा एक कृत्रिम उपग्रह नसून एक उच्चक्षमतेची वेधशाळा आहे, जी सूर्याचा अभ्यास करेल. यामध्ये विशेषकरून सूर्याचा बाह्यस्तर म्हणजे सोलार कोरोनामध्ये होणारी उष्णता निर्मिती, सोलार विंड, कोरोनल मास इजेक्शन, सोलार फ्लेअर्स अशा एकंदरीत सौर वातावरणाचा व त्यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास होणार आहे. आदित्य L1वरील सातपैकी ४ पेलोड सूर्याच्या दिशेने आहेत, तर ३ पेलोड विविध प्रयोग करतील, त्यामुळे सूर्यमालेतील सूर्याच्या विविध अंगाने शास्त्रीय माहिती मिळणार आहे.  (ISRO Aditya L1 Mission Updates)

सूर्याचा अभ्यास अंतराळातूनच का?

दिवसाचे बारा तास सूर्य आपल्याला दिसतो, मग त्याच्या अभ्यासासाठी अंतराळात जाण्याची गरज काय? सूर्याचे किरण आपल्यापर्यंत येतात, सूर्याचे निरीक्षण आपण पृथ्वीवरून करू शकतो हे खरं आहे पण सूर्यापासून येणारी प्रत्येक किरणे आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही कारण पृथ्वीचे वातावरण व चुंबकीय क्षेत्र आपल्यासाठी संरक्षक आवरण म्हणून कार्य करते. त्यामुळे अंतराळातुन सूर्याचा अभ्यास केल्यास तो सर्वसमावेशक ठरतो. (ISRO Aditya L1 Mission Updates)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT