Latest

इस्राईलची हमास विरोधात लष्करी कारवाई सुरू; ४ पॅलेस्टिनी नागरिक ठार | Israel Operation against Hamas

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टाईनमधील दहशतवादी बंडखोर संघटना हमासने इस्राईलवर ५००० रॉकेट डागल्यानंतर इस्राईलने हमासविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. इस्राईलने या कारवाईला Operation Iron Swords असे नाव दिले आहे. इस्राईलने गाझा पट्टीत हल्ले सुरू केले असून जवळपास १२ लढाऊ विमान या मोहिमेत तैनात करण्यात आले आहेत. या हल्ल्यात पॅलेस्टाईनचे चार नागरिक ठार झाले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात इस्राईलचे ४ नागरिक ठार झाले आहेत. (Israel Operation against Hamas)

दरमान्य या संघर्षात युरोपियन युनियनने इस्राईलला पाठिंबा दिला आहे. इस्राईल लष्कराचे प्रवक्ते डॅनिएल हगारी यांनी हमासच्या दहशतवाद्यांनी जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने इस्राईलमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी हमासच्या हल्ल्यांचा निषेध केला असून युरोप इस्राईलच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. अल जझिराने ही बातमी दिली आहे.

दरम्यान इस्राईलच्या राजदूतांनी अमेरिकेशी संपर्क साधला असून इस्राईल्या स्वसंरक्षाच्या अधिकाराला जगाकडून पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर इस्राईलमधील अमेरिकी दूतावासाने परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचे म्हटले आहे. (Israel Operation against Hamas)

गाझा पट्टीचा वाद काय आहे?

गाझा पट्टी हा भाग पूर्वी पॅलेस्टाईनचा भाग होता आणि येथे स्वयंशासन होते. पण १९६७ला झालेल्या अरब-इस्राईल युद्धानंतर वेस्ट बँक, पूर्व जेरुजलेम या दोन भागांसह गाझा पट्टीही इस्राईलच्या नियंत्रणात आली. मिडटेरियन किनारपट्टीचा हा भाग आहे. गाझा पट्टीच्या सीमेला इजिप्त आणि इस्राईल येतात. गाझा पट्टीचा भूभाग ३६५ चौरस किलोमीटरचा आहे, म्हणजे जवळपास लखनऊ इतका हा भाग आहे.

इस्राईलची निर्मिती १९४८ झाली. १९४८ला अरब-इस्राईल युद्ध झाले होते, त्यानंतर १९६७ पर्यंत हा भूभाग इजिप्तच्या ताब्यात होता.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू गाझा पट्टी हा भूभाग राहिला आहे. गाझा पट्टीवर आता जी निर्बंधांची स्थिती आहे, ती २००७पासून आहे. इस्राईल गाझा पट्टीची हवाईक्षेत्र आणि जमिनीवरील पाण्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊन आहे. तसेच सीमेवर असणारे बहुतांश क्रॉसिंग पॉईंटही इस्राईलच्या ताब्यात आहेत. तर काही क्रॉसिंग पॉईंटवर इजिप्तचा ताबा आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT