Latest

Hamas and Israel war | क्रुरतेचा कळस! हमास दहशतवाद्यांकडून महिलेची अर्धनग्न अवस्थेत धिंड

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टाईनमधील दहशतवादी बंडखोर संघटना हमासने इस्राईलवर ५००० रॉकेट डागल्यानंतर इस्राईलने हमासविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, हमास दहशतवादी एका इस्राईल महिला सैनिकाला अर्धनग्न अवस्थेत ओपन गाडीमधून फिरवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरलं व्हिडिओनंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.  ((Israel-Palestine Crisis)

इस्राईलने हमासविरोधात सुरु केलेल्या  कारवाईला Operation Iron Swords असे नाव दिले आहे. क्रुरतेचा कळस! हमास दहशतवाद्यांकडून महिला सैनिकाची विटंबनाने गाझा पट्टीत हल्ले सुरू केले असून जवळपास १२ लढाऊ विमान या मोहिमेत तैनात करण्यात आली आहेत. या हल्ल्यात पॅलेस्टाईनचे चार नागरिक ठार झाले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात इस्राईलचे ४ नागरिक ठार झाले आहेत. दरमान्य, या संघर्षात युरोपियन युनियनने इस्राईलला पाठिंबा दिला आहे. इस्राईल लष्कराचे प्रवक्ते डॅनिएल हगारी यांनी हमासच्या दहशतवाद्यांनी जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने इस्राईलमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे.

Israel-Palestine Crisis : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमास दहशतवादी नागरिकांची हत्या करत आहेत. त्यांना ओलीस ठेवत आहेत, असे वृ्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. अतिरेक्यांनी हल्ल्यादरम्यान मारल्या गेलेल्या नागरिकांचे मृतदेह उघड्या ट्रकमध्ये नेले जात असून त्यांना शहरात फिरवले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. हमास दहशतवादी एका इस्रायली महिला सैनिकाला अर्धनग्न अवस्थेत उघड्या ट्रकवर घेऊन रस्त्यावरुन फिरवले जात आहे. इस्राईलवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी नागरिकांची हत्या करत आहेत आणि त्यांना ओलीस ठेवत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये पॅलेस्टिनी नागरिक महिलेच्या मृतदेहाला शिवीगाळ करताना आणि महिलेवर थुंकताना आणि तिला थप्पडही मारताना दिसत आहे.

गाझा पट्टीचा वाद काय आहे?

गाझा पट्टी हा भाग पूर्वी पॅलेस्टाईनचा भाग होता आणि येथे स्वयंशासन होते. पण १९६७ला झालेल्या अरब-इस्राईल युद्धानंतर वेस्ट बँक, पूर्व जेरुजलेम या दोन भागांसह गाझा पट्टीही इस्राईलच्या नियंत्रणात आली. मिडटेरियन किनारपट्टीचा हा भाग आहे. गाझा पट्टीच्या सीमेला इजिप्त आणि इस्राईल येतात. गाझा पट्टीचा भूभाग ३६५ चौरस किलोमीटरचा आहे, म्हणजे जवळपास लखनऊ इतका हा भाग आहे.

इस्राईलची निर्मिती १९४८ झाली. १९४८ला अरब-इस्राईल युद्ध झाले होते, त्यानंतर १९६७ पर्यंत हा भूभाग इजिप्तच्या ताब्यात होता.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू गाझा पट्टी हा भूभाग राहिला आहे. गाझा पट्टीवर आता जी निर्बंधांची स्थिती आहे, ती २००७पासून आहे. इस्राईल गाझा पट्टीची हवाईक्षेत्र आणि जमिनीवरील पाण्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊन आहे. तसेच सीमेवर असणारे बहुतांश क्रॉसिंग पॉईंटही इस्राईलच्या ताब्यात आहेत. तर काही क्रॉसिंग पॉईंटवर इजिप्तचा ताबा आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT