Latest

Israel-Hamas war Updates: इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात रफाहमध्ये 100 हून अधिक नागरिक ठार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने ओलीस ठेवलेल्‍या नागरिकांची सुटका करण्‍यासाठी इस्रायलने आज (दि.१२) गाझा पट्टीतील रफाहमध्ये पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यात आतापर्यंत १०० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले, तर अनेक जखमी झाले. बचाव कार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्‍याची शक्यता वर्तवली जात आहे.  इस्रायल सैन्याने रफाहमध्ये दोन इस्रायली नागरिकांची सुटका केली आहे, असे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. (Israel-Hamas war Updates)

इस्रायली सैन्य, देशांतर्गत शिन बेट सुरक्षा सेवा आणि रफाहमधील विशेष पोलिस युनिट यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत फर्नांडो मारमन (वय ६०), लुई हेरे (वय ७०) या दोन इस्रायली ओलिसांची सुटका केली आहे, असे लष्कराने दिलेल्या माहितीत सांगितले आहे. (Israel-Hamas war Updates)

७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्‍ला केला होता. यावेळी फर्नांडो आणि लुई यां दोघांचे हमासने किबुत्झ नीर यित्झाक येथून अपहरण केले होते. आजच्‍या कारवाईसंदर्भात माहिती देताना इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड यांनी सांगितले की, " आज करण्‍यात आलेली कारवाई ही गुंतागुंतीचे होती. यासाठी मागील काही दिवस आम्‍ही काम करत होतो. योग्य परिस्थितीची वाट पाहत होतो. ओलिसांना एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. इस्रायलच्‍या सैन्‍याने धडक कारवाई करत ओलिसांची सुटका केली. यावेळी लष्‍कराच्‍या जवानांसह ओलिसांना बाहेर काढण्यासाठी हवाई हल्ला करण्यात आला." (Israel-Hamas war Updates)

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने असे म्हटले आहे की, सैन्याला रफाह रिकामी करण्यासाठी आणि तेथे तैनात असलेल्या हमासच्या चार बटालियन नष्ट करण्यासाठी योजना विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये 1,200 लोक मारले आणि 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात किमान 250 लोकांचे अपहरण केले होते. इस्रायली उंच. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या लष्करी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे ज्यात 28,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, असे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. (Israel-Hamas war Updates)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT