Latest

Israel Hamas War : गाझात युद्ध थांबवण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजूर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-हमास युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UN Security Council) गाझामधील मानवतावादी मदतीसाठी युद्ध थांबविण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी विशेष सत्रादरम्यान आणलेल्या ठरावाला १२ देशांनी पाठिंबा दिला, तर अमेरिका, रशिया आणि ब्रिटनने मतदानात भाग घेतला नाही.

संबंधित बातम्या : 

नवीन ठराव गाझा पट्टीतील मानवतावादी मदतीसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करण्याची मागणी करतो. याशिवाय लहान मुलांसाठी विशेष संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, माल्टाने मांडलेल्या या प्रस्तावात कोठेही इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आवाहन करण्यात आलेले नाही. तर, चीन आणि रशियाला मात्र तात्काळ युद्धबंदी हवी आहे.

युद्ध थांबवण्याचे आसियानचे आवाहन

दक्षिण-पूर्व आशियाई देशांची संघटना असलेल्या आसियानच्या संरक्षण मंत्र्यांनी बुधवारी मंत्रिस्तरीय बैठकीत इस्रायलला गाझावरील हल्ले त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. आसियान संरक्षण मंत्र्यांनी मानवतावादी मदतीसाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याचेही आवाहन केले आहे.

गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाचा ताबा इस्रायलकडे

इस्त्रायली सैन्याने बुधवारी गाझातील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयावर ताबा मिळवला. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले की, रुग्णालयाच्या तळघरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडली आहेत. यापूर्वी रुग्णालयात अनेक ठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयांमध्ये अजूनही अनेक ठिकाणी दहशतवादी असू शकतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT