Latest

ISI व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घुसखोरीच्या प्रयत्नात!, गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

रणजित गायकवाड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ISI Pakistan : देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती एकत्रित करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर-सर्विसेस इंटेलिजेंन्स (आयएसआय) सुरक्षा दलात तैनात कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अशाप्रकारचा प्रयत्न अगोदर देखील आयएसआयकडून करण्यात आला होता. यासंबंधी गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षा दलांना अलर्ट देण्यात आला आहे. बनावट ओळखीच्या आधारे अनेक गट फेसबुक, व्हॉट्सॲप, टेलीग्राम, सिग्नल, व्हीचॅट तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये घुसघोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अशात विविध सुरक्षा दलांमण्ध्ये तैनात जवानांनी सोशल मीडियावर कुणाचीही 'फ्रेंड रिक्वेस्ट'न स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा दलातील जवानांना इतर सोशल नेटवर्कवरून अथवा व्हॉट्सॲप कॉल, इंटरनेट कॉल करण्यापासून रोखण्यात यावे. अलर्टनूसार रजेवर जाणाऱ्या जवानांना देखील त्यांच्या येण्याजाण्याची माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यापासून कटाक्षाने रोखले जावे, असे देखील सांगण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार विविध दलात तैनात जवान तसेच कर्मचा-यांसाठी हा प्रोटोकॉलचा भाग आहे. जवान आणि कर्मचार्यांनी याचे पालन केलेच पाहिजे.

तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर जम्मू-काश्मिर तसेच पश्चिमेकडील सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अशात गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा कर्मचार्यांना संवेदनशील ठिकाणी विशेषत: सीमावर्ती भागात विविध समाज माध्यमांचा वापर करण्यापासून रोखावे, अशी सूचना सरकारला दिली आहे.

आयएसआय खोटे फेसबुक, इंस्टाग्राम, टेलीग्राम तसेच इतर सोशल साईटवर सक्रिय आहे. आयएसआय ने सोशल मीडियात समूहांमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न केले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आयएसआयच्या कारवाया लक्षात घेता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये कार्यरत जवानांना केवळ सुरक्षित संचार नेटवर्क वर संवाद करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सोबतच सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांचा इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राकडून देण्यात आलेला सरकारी ईमेल नेटवर्कचा उपयोग करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT