Latest

Iran news : हॉटेलमध्ये विना हिजाब जेवल्या प्रकरणी महिलेला अटक; इराणमध्ये व्हायरल फोटोवरून कारवाई

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणमधील एका हॉटेलमध्ये विना हिजाब जेवण खाल्ल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. इराणच्या सुरक्षा दलांनी ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे. ही अटक एका छायाचित्राच्या आधारे करण्यात आली आहे. यामध्ये ही महिला एका हॉटेलमध्ये हिजाबशिवाय बसलेली दिसत आहे. बुधवारी समोर आलेल्या या प्रकरणामध्ये राजधानी तेहरानमधील एका हॉटेलमध्ये दोन महिला नाश्ता करताना दिसत आहेत.

छायाचित्रातील हॉटेलमधील महिलांपैकी डोन्या रॅड यांना हे चित्र ऑनलाइन शेअर झाल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली. रॅड यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांनी डोन्याशी संपर्क साधला आणि तिला तिच्या कृत्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावले.

तेहरानच्या कुप्रसिद्ध तुरुंगात कैद

डोन्या यांच्या बहिणीने सीएनएनला दिलेल्या माहितीनूसार, डोन्या यांच्या सोबत फोनद्वारे झालेल्या संवादानंतर त्यांना अटक झाली असल्याचे समजले. तसेच त्यांची एव्हिन जेलच्या वॉर्ड 209 मध्ये बदली झाली असल्याचे देखील सांगितले. तेहरानचे एविन तुरुंगाची कुप्रसिद्ध म्हणून ओळख आहे. या ठिकाणी इराणी राजवटीतील राजकीय असंतुष्टांना व्यक्तींना कैद केले जाते. विशेषत: या तुरुंगात टाकलेले लोक ते आहेत ज्यांना इराणच्या गुप्तचर मंत्रालयाने देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानले गेले आहे. इराणमधील हॉटेलमध्ये पुरुषांचे वर्चस्व असलेले देखील पहायला मिळते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT