

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान (Imran Khan) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार इस्लामाबादच्या एका न्यायाधीशांनी इम्रान खान यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावला आहे. २० ऑगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्या संबंधित ही टिप्पणी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, २० ऑगस्ट रोजी एका रॅलीदरम्यान जेबा चौधरी या महिला न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी खान (Imran Khan) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची अली जावेद यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा