Latest

Dariush Mehrjui : प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक दारियुश मेहरजुई आणि त्यांच्या पत्नीची हत्या

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक दारियुश मेहरजुई आणि त्यांच्या पत्नीची चाकू भोसकून हत्या करण्यात आलीय. ही घटना त्यांच्या राहत्या घरात झाली. (Dariush Mehrjui ) इराणमधील प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक दारियुश मेहरजुई यांची शनिवारी संध्याकाळी तेहरानजवळ पत्नीसह भोसकून हत्या करण्यात आली. दारियुश मेहरजुई आणि त्यांची पत्नी वहिदेह मोहम्मदीफर यांचे मृदेह त्यांच्या घरी आढळले. या दोघांवर चाकूने हल्ला झाला. (Dariush Mehrjui )

संबंधित बातम्या –

रिपोर्टनुसार, प्रांतीय मुख्य न्यायाधीशांनी सांगितले की, दारियुश मेहरजुई आणि त्यांची पत्नी वहिदेह मोहम्मदीफर यांच्या मानेवर अनेक वार करून मारण्यात आले आहे.

तेहरानजवळील अल्बोर्झ प्रांताचे मुख्य न्यायाधीश होसैन फजेली-हरिकांडी म्हणाले, दरियुश मेहरजुई यांनी त्यांची मुलगी मोना हिला स्थानिक वेळेनुसार रात्री ९.३० वाजता एक संदेश पाठवला. तिला करज येथील त्यांच्या घरी रात्रीच्या भोजनासाठी आमंत्रित केले. परंतु, ती जेव्हा दरियुश मेहरजुई यांच्या घरी पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की, तिच्या पालकांच्या मानेवर वार केल्याच्या खुणा आहेत आणि दोघांचे मृतदेह पडले आहेत.

SCROLL FOR NEXT