Latest

Ira Khan Wedding : इराचे Puzzle वेडिंग इनविटेशन कार्ड! आधी कोडे सोडवा, मगच…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) च्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. (Ira Khan Wedding) आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) जानेवारी, २०२४ मध्ये बॉयफ्रेंड नुपुर शिखरे (Nupur Shikhare) सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. याआधी दोघांचा साखरपुडा झाला होता. आता आमिरच्या घरी लग्नाची तयारी सुरु आहे. (Ira Khan Wedding)

संबंधित बातम्या –

इरा खानने आपल्या जवळच्या मित्रांना वेडिंग इनविटेशन कार्ड पाठवणे सुरु केले आहे. इराने आपल्या लग्नासाठी कस्टमाईज्ड पझल कार्ड निवडलं आहे. जे पाहून तुमचेही डोके चक्रावेल. हे खास इनव्हिटेशन कार्ड सोशल मीडियावर शेअर करून एक नोटदेखील लिहिण्यात आलीय.

इरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचे मित्र-मैत्रीण पझल जोडताना दिसत आहेत. दरम्यान, तिचे मित्र डोक्याला हात लावताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना इराने लिहिने, "पोपेय: याला थोडे-थोडे करून एडिट करा. मी तर एका रात्रीत केलं. याचे नियोजन एप्रिल पासून सुरु आहे. 'देर आए दुरुस्त आए'. याशिवाय, आता मिष्टी! आम्ही एक महिन्याच्या आत लग्न करणार आहोत. मित्रांनो मी तुम्हा लोकांशी खूप प्रेम करते. काय आपण माझ्या आयुष्यात लोकांची विविधता आणि व्याप्ती पाहत आहात!"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT