Latest

ऋषभ पंत IPL लिलावात आज बजावणार ‘ही’ भूमिका

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क :  यष्‍टीरक्षक आणि आयपीएल दिल्ली कॅपिटल्सचा तत्‍कालिन कर्णधार ऋषभ पंत यावेळी लिलावात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ऋषभ पंत स्वतः दिल्ली कॅपिटल्सच्या लिलावाच्या टेबलावर बसून खेळाडूंवर बोली लावणार आहे. या भूमिकेत दिसणारा तो सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.  (IPL Auction 2024)

दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळाडूंवर बोली लावणार

ऋषभ पंतचा 2022च्या अखेरीस अपघात झाला. डिव्हायडरला धडकल्याने त्यांची भरधाव कार जळून खाक झाली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. (IPL Auction 2024) मैदानात परतण्यासाठी सध्या ऋषभ विकेटकीपिंग आणि फलंदाजीसाठी सराव करून स्वत:ला तयार करत आहे. दरम्यान, आयपीएल 2024च्या लिलावासाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला नवी भूमिका दिली आहे. लिलावादरम्यान तो दिल्ली कॅपिटल्सच्या टेबलवर बसून खेळाडूंवर बोली लावताना दिसणार आहे.

तो काळ माझ्यासाठी खूप अवघड होता

लिलावातील आपल्या नव्या भूमिकेबाबत ऋषभ पंत म्हणाला की, आयपीएल स्‍पर्धेत सहभागी हाेणार्‍या खेळाडूंवर बोली लावण्याची माझी इच्छा होती. आयपीएलमधील एखाद्या संघासाठी योगदान देण्याची भुमिका होती. आता हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मैदानात पुनरागमन करण्याबाबत तो म्हणाला की, तो काळ माझ्यासाठी खूप अवघड होता. सुरुवातीला खूप वेदना सहन कराव्या लागल्या; पण हळूहळू गोष्टी सोप्या झाल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT