Latest

Shah Rukh Khan : केकेआरच्या यशानंतर विराटसोबत थिरकला शाहरूख (Video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन्ही संघ आमने-सामने होते. हा खास सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान मुलगी सुहाना खान आणि तिची मैत्रीण शनाया कपूरसह क्रिकेट पाहण्यासाठी पोहोचला होता. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) पराभव केला. केकेआरच्या विजयानंतर संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ( Shah Rukh Khan ) मैदानावर उतरून विराट कोहलीसोबत थिरकला.

आयपीएल २०२३ मध्ये केकेआरचा विजय होताच थेट शाहरूख खान ( Shah Rukh Khan ) मैदानात उतरला आणि क्रिकेटर विराट कोहलीचे कौतुक करत अभिनंदन केले. दरम्यान शाहरूखने त्याच्या पठान चित्रपटातील 'झूमे जो पठान' या धमाकेदार गाण्यावर विराटसोबत थिरकला. शाहरूखने यावेळी विराटला खास करून गाण्याच्या टेप्सदेखील शिकविल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांचेही भरभरून अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला. शाहरूख आणि विराट यांच्यातील दोघांचे चांगले बॉन्डिंग पाहायला मिळाले.

या व्हिडिओवर कॉमेन्टस करताना एका यूजरने लिहिले की, 'दोन्ही स्टार्स एकत्रित.' तर दुसऱ्या युजरने 'KKR ने आयपीएल सामना जिंकला आणि शाहरुख खानने चाहत्यांचे मन जिंकले' म्हटले आहे. दरम्यान, आयपीएल सामना पाहण्यासाठी शाहरूखची मुलगी सुहाना खान आणि तिची मैत्रीण शनाया कपूरही सहभागी झाली होती. यावेळी सुहानाच्या फ्लोरल डीपनेक ड्रेसने चारचाँद लावले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT