पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन महिन्यापासून सुरू असलेला आयपीएलचा १६ वा हंगाम समाप्तीच्या जवळ पोहचला आहे. सध्या हंगामाचे एक क्वालिफायर आणि फायनल असे दोनच सामने शिल्लक आहेत. आयपीएलच्या चाहत्यांना रविवारी (दि.२८) गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सांगता समारंभाचे वेध लागले आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेन्नई आधीच पोहचली आहे. तर, अंतिम सामन्यात चेन्नईला मुंबई-गुजरात यापैकी कोण भिडणार हे ठरणार आहे. (IPL 2023 Closing Ceremony)
आयपीएलने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीला कोणते दिग्गज कलाकार थिरकणार आहेत याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध रॅपर किंग आणि डीजे न्युक्लिया हे या सेरेमनीचे मुख्य आकर्षण असणार आहेत. त्याचबरोबर त्यांना साथ देण्यासाठी गायक डिवाईन आणि जोनिता गांधी देखील असणार आहेत. (IPL 2023 Closing Ceremony)
यंदाच्या हंगामातील अंतिम सामना खूप रंजक ठरणार आहे. गतविजेत्या गुजरातसमोर क्वालिफायर २ सामन्यात मुंबईचे तगडे आव्हान आहे. जर गुजरातने सामन्यात विजय मिळवला. तर, त्यांना सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल जिंकण्याची संधी आहे. आयपीएलच्या हंगामात सलग विजेतेपद पटकवण्याची कामगिरी फक्त दोन संघांनाच करता आली आहे. ते संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स.