Latest

IOCL Jobs: आईटीआई, इंजनिअरिंग केलेल्यांसाठी इंडियन ऑईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: आईटीआई (ITI) मधून विविध ट्रेडमध्ये डिप्लोमा आणि पॉलिटेक्निकच्या विविध शाखांमध्ये इंजिनिअरिंग केलेल्या तरुणांसाठी नोकरीसाची (IOCL Jobs) ही सुवर्णसंधी मिळणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) त्यांच्या पाइपलाइन विभागातील विविध ठिकाणी नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांवर रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन इंडिया (IOCL) कडून जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीत सध्या, गैर-कार्यकारी (IOCL Jobs) श्रेणीच्या 56 रिक्त पदांवर पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. IOCL च्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 ऑक्टोबर असणार आहे. इच्छुक उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, SC/ST/PWBD उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

वेतन

वेतनश्रेणी IV अंतर्गत अभियांत्रिकी सहाय्यक (मेकॅनिकल), अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल), अभियांत्रिकी सहाय्यक (T&I) आणि अभियांत्रिकी सहाय्यक (ऑपरेशन्स) या पदांसाठी वेतनश्रेणी 25,000 ते 1,05,000 रुपये प्रति महिना असेल. तर तांत्रिक परिचर-I या पदासाठी वेतन श्रेणी-I अंतर्गत 23,000 ते 78,000 रुपये प्रति महिना या श्रेणीत असेल. त्याच वेळी, मूळ वेतन, डीए, एचआरए आणि असे इतर फायदे नियमांनुसार देण्यात येणार असल्याचे या जाहिरातीत सांगण्यात आले आहे.

IOCL भरती 2022, महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याची तारीख: 12 सप्टेंबर 2022
ऑनलाइन अर्ज नोंदणी शेवटची तारीख: ऑक्टोबर 10, 2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022
ऑनलाइन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख: 27 ऑक्टोबर 2022
अर्ज, प्रवेशपत्र प्रिंट करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2022

IOCL भर्ती 2022 साठी असा करा Apply

  • सर्वप्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाईट iocl.com वर जा.
  • होम पेजवरील IndianOil For You या पर्यायावरती जा. यानंतर IndianOil For Careers वर जा. तीन पर्याय ओपन होतील, यामधील
  • Latest Job Opening पर्यायावरती गेल्यानंतर Job Oppening या पर्यायावरती क्लिक करा. यामध्ये तुम्हाला या जाहिरात मिळेल.
    यामधील Click Here to Apply Online या पर्यायावरती क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, यामधील Recruitment of Engineers / Officers and Engagement of Graduate Apprentice Engineers through GATE-2022 (https://ioclapply.com/Home.aspx) या जाहिरातीवर नोंदणी करा आणि साइन इन करा.
  • त्यानंतर IOCL भर्ती 2022 साठी अर्ज करतात.
  • आता सर्व तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
    अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT