कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. संघटनांनी आज (दि.७) पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद (kolhapur bandh) ठेवण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे. याबाबत गृहविभागाकडून जिल्हा प्रशासनाला आदेश प्राप्त झाले आहेत.
उद्या (गुरूवारी) रात्री 12 पर्यंत कोल्हापुरातील सर्व इंटरनेट सेवा बंद (kolhapur bandh) राहणार आहे. त्याचबरोबर एसएमएस सेवा सुद्धा होणार बंद राहणार आहे. आज (दि. 7) सायंकाळी 5 वाजल्यापासून गुरूवारी (दि.8) रात्री 12 पर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, सामाजिक शांतता आणि सलोखा कायम राहण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी इंटरनेट सेवा बंद करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार गृहविभागाकडून याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
हेही वाचा