Latest

Money Londering Case : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Money Londering Case मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर सोबत मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या जॅकलिन अडकली आहे.

Money Londering Case सुकेश चंद्रशेखर सोबत मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या जॅकलिननला आज न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस पतियाळा हाऊस कोर्टात दाखल झाली आहे. याप्रकरणी तिच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंदर मलिक यांनी जामीन याचिकेवर ईडीकडून उत्तर मागितले. तोपर्यंत तिचा नियमित जामीन कोर्टासमोर प्रलंबित आहे. जॅकलिनच्या वकिलाच्या विनंतीवरून कोर्टाने जॅकलिनला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.
सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन आणि नोरा फतेही या अभिनेत्रींची नावे समोर आली. त्यानंतर या दोघींची ईडीने चौकशी केली. वेगवेगळ्या वेळी जॅकलीनची ईडीने कसून चौकशी केली. 14 सप्टेंबरला तिची दिल्लीती आर्थिक गुन्हेशाखा कार्यालयात जॅकलिनीची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, नोरा फतेहीला या प्रकरणी काही दिवसापूर्वी क्लिन चीट मिळाली आहे.

Money Londering Case सुकेश चंद्रशेखर हा महाठग असून सध्या तो तुरुंगात आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या आरोपात त्याला तुरुंगवास झाला आहे. सुकेशवर फोर्टेस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीकडून 200 कोटी उकळल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात जॅकलिन आणि नोराची नावे समोर आल्यानंतर अनेक गोष्टींचे खुलासे होत गेले. या दोन्ही अभिनेत्रींनी सुकेशकडून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे माहित असूनही त्याच्याकडून महागडी गिफ्ट स्वीकारली. तपासात समोर आलेल्या माहितीनंतर सुकेश जॅकलीनची लव्ह स्टोरी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फोटोंसह व्हायरल झाली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT