Latest

INDvsAUS Test : ‘विराट’ खेळीने अहमदाबाद कसोटीवर भारताची मजबूत पकड, ऑस्ट्रेलिया ८८ धावांनी पिछाडीवर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभमन गिलचे दमदार शतक, यानंतर विराट कोहलीच्‍या तडाखेबाज १८६ धावा आणि त्‍याला अक्षर पटेलची ७९ धावांची आश्‍वासन साथ  जोरावर अहमदाबाद कसोटी सामन्‍यावर भारताने मजबूत पकड निर्माण केली आहे. ऑस्‍ट्रेलियाने ८८ धावांनी पिछाडीवर असून, आता सोमवारी सामन्‍याचा पाचवा दिवस निर्णायक ठरण्‍याची शक्‍यता आहे. (INDvsAUS Test)

आज सामन्‍याच्‍या चौथ्‍या दिवशी भारताने ३ बाद चौथ्‍या दिवशी ३ बाद २९७ धावांवरुन भारताने आपला पहिला डाव पुढे सुरु केला. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी संयमित फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. मात्र 309 धावांवर भारताची चौथी विकेट पडली. रवींद्र जडेजा 84 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. टॉड मर्फीने त्याला उस्मान ख्वाजाकडून झेलबाद केले.

विराट कोहलीची स्‍मरणीय खेळी 

विराट कोहलीने 241 चेंडूत शतक पूर्ण केले. त्‍याच्‍या या आश्‍वासक फलंदाजीमुळे भारताने ४०० धावांचा टप्‍पा पार करता आला. त्‍याला यष्‍टीरक्षक भरतचीही चांगलीच साथ लाभली. तो ४४ धावांर बाद झाला. विराटने 23 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. आता 3 वर्षे 3 महिने 17 दिवसांच्या (1204 दिवस) प्रतीक्षेनंतर विराटच्या बॅटने तीन आकडी धावसंख्येचा टप्पा पूर्ण केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सातवे, कसोटीतील 28 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधेल त्याचे हे 75 वे शतक आहे.

भारताची पाचवी विकेट श्रीकर भरतच्या रूपाने पडली. भारताचा निम्मा संघ 393 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.भरतची विकेट नॅथन लायनने घेतली. भरतने 88 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. त्याने विराटसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले.

अक्षर पटेल आणि विराट कोहली यांची 150 धावांची भागीदारी

अक्षर पटेल आणि विराट कोहली यांनी 150 धावांची भागीदारी केली आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक पद्धतीने धावा करत आहेत. भारताची आघाडीही 70 धावांपेक्षा जास्त झाली आहे. विराट त्याच्या द्विशतकाकडे तर अक्षर पटेल शतकाकडे वाटचाल करत आहे.

अक्षरचे शतक हुकले

भारताची सहावी विकेट 555 धावांवर पडली. अक्षर पटेल 113 चेंडूत 79 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. मिचेल स्टार्कने त्याला क्लीन बोल्ड केले. ५६८ धावांच्या स्कोअरवर भारताची सातवी विकेट पडली. रविचंद्रन अश्विन 12 चेंडूत सात धावा करून बाद झाला. ५६९ धावांच्या स्कोअरवर भारताची आठवी विकेट पडली. उमेश यादव खाते न उघडता धावबाद झाला. त्याला विराटच्या सांगण्यावरून दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात उमेशने आपली विकेट गमावली.

विराटचे द्विशतक हुकले

सामन्यातील शेवटच्या काही षटके  शिल्लक असताना विराटने आपल्या फलंदाजीचा गियर बदलला. त्याने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. परंतु त्याला यातून फार धावा त्याला करता आल्या नाहीत. षटकार मारणाच्या प्रयत्नात तो बाद झाला. यासह त्याचे द्विशतक करण्याची संधी भंगली. (INDvsAUS Test)

भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने 91 धावांची आघाडी घेतली. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 186 धावा केल्या. त्याचवेळी शुभमन गिलने १२८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही ७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. या डावात भारताच्या नऊ विकेट पडल्या, पण श्रेयस अय्यर दुखापतीमुळे फलंदाजीला येऊ शकला नाही आणि भारताचा डाव नऊ विकेट्सवर संपुष्टात आला. (INDvsAUS Test)

ऑस्‍ट्रेलिया ८८ धावांनी पिछाडीवर

भारतानेकडे असलेल्या 91 धावांच्या आघाडीचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून  ट्रॅव्हिस हेड आणि कुहनमन मैदानात उतरले आहेत. त्यांनी 6 ओव्हरमध्ये 3 धावा केल्या आहेत. यामध्ये  हेडने 18 बॉल खेळून 3 धावा केल्या आहेत. तर  कुहनमनने अजून खाते उघडलेले नाही.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीने भारताला धक्का

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास झाला होता. यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णायलात नेण्यात आले. सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांची काळजी घेत आहे. भारताच्या पहिल्या डावात अय्यरच्या जागी श्रीकर भरतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT