Latest

देशातील दुसरे Apple चे रिटेल स्टोअर दिल्लीत सुरू; सीईओ टीम कुक यांनी केले ग्राहकांचे स्वागत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयफोन निर्माता कंपनी Appleने दिल्ली येथे देशातील दुसरे रिटेल स्टोअर आज (दि.२०) सुरू केले आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी या स्टोअरचे उद्धाटन केले. दोन दिवसांपुर्वी कंपनीचे भारतातील पहिले रिटेल स्टोअर मुंबईत उघडण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेले रिटेल स्टोअर सिटीवॉक मॉलमध्ये उभारण्यात आले आहे. सुमारे १० ते १२ हजार स्क्वेअरफूटमध्ये हे स्टोअर उभारले आहे. सीईओ टिम कुक यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन झाले. सिटीवॉक मॉलमध्ये स्टोअर उघडण्यापूर्वी ग्राहक रांगेत उभे होते. सीईओ कुक यांनी ग्राहकांचे स्वागत केले. तसेच चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. मुंबईतील अॅपल स्टोअरपेक्षा साकेत स्टोअर लहान आहे. या स्टोअरमध्ये ७० पेक्षा जास्त रिटेल टीम सदस्य आहेत. हे सदस्य भारतातील १८ राज्यांमधून आले असून ते १५ पेक्षा जास्त भाषा बोलतात. कूक हे सात वर्षांनी भारत दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत Apple चे देशातील पहिले अधिकृत रिटेल स्टोअर उघडले. २०१६ मध्ये त्यांनी शेवटची भारताला भेट दिली होती. कुक यांनी त्यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची भेट देखील घेतली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT