पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी 8 व्या दिवसापर्यंत 53 पदकांची कमाई केली आहे. ज्योती याराजी हिने महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक पटकावले. ज्योतीचे पदक अपग्रेड झाले. यापूर्वी तिला कांस्यपदक मिळणार होते. मात्र, चिनी महिला खेळाडूने अप्रामाणिकपणा दाखवला. त्यानंतर मोठा गदारोळ माजला. दरम्यान, चीनची खेळाडू दोषी आढळल्याने तिचे पदक काढून घेतले. त्यामुळे ज्योतीला रौप्यपदक मिळाले. (Asian Games 2023)
संबंधित बातम्या
Asian Games 2023 : चुकीच्या सुरुवातीनंतर अंतिम फेरीत थांबविले
महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीच्या अंतिम फेरीत भारताच्या ज्योती याराजीला चुकीच्या सुरुवातीसाठी दोषी घोषित करण्यात आले. याशिवाय, अधिकाऱ्यांनी चीनच्या वू यानीला अंतिम फेरीत जाण्यापासून रोखले. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा मावळल्या. यानंतर भारतीय खेळाडूने ही बाब अधिकाऱ्यांसमोर ठेवली.
प्रचंड विरोधानंतर रौप्य पदक मिळाले
यानंतर भारतीय अॅथलेटिक्सप्रेमींनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. भारतीय ऍथलेटिक्स प्रमुख अंजू बॉबी जॉर्ज यांनीही आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकार्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. फेरी संपल्यानंतर काही मिनिटे पदकतालिका निश्चित झाली नाही. शेवटी, तीव्र विरोधानंतर पुनरावलोकन केल्यावर चीनच्या वू यानीला अपात्र ठरवण्यात आले. आणि याराजीला रौप्य पदक देण्यात आले.
हेही वाचा