Latest

Team India New Record : भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा 24 वर्षांपूर्वी ‘हा’ विक्रम!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India New Record : भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने द. आफ्रिकन संघाला 297 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 218 धावांवर ऑलआऊट झाला. सामना जिंकण्यासोबतच टीम इंडियाने मालिकाही 2-1 अशी खिशात घातली. दरम्यान हा सामना जिंकून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

भारताचा 27 वनडेंमध्ये विक्रमी विजय

वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकून लक्ष्यवेधी कामगिरी केली. पण या संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले. खरेतर भारतीय संघाने वर्ष 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळ केला आहे. या वर्षभरात टीम इंडियाने 35 वनडे सामने खेळले असून त्यापैकी 27 सामने जिंकले आहेत. या आधी ऑस्ट्रेलियाने 1999 मध्ये 37 एकदिवसीय सामन्यांपैकी 26 मध्ये विजय मिळवून विक्रम नोंदवला होता. पण आता भारताने ऑस्ट्रेलियाचा तो 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. (Team India New Record)

एका वर्षात सर्वाधिक वनडे सामने जिंकणारे संघ : (Team India New Record)

30 सामने : ऑस्ट्रेलिया, 2003
27 सामने : भारत, 2003
26 सामने : ऑस्ट्रेलिया, 1999
25 सामने : द. आफ्रिका, 1996
25 सामने : द. आफ्रिका, 2000

द. आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकली

भारतीय संघाने द. आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 8 गडी राखून जिंकला. यानंतर यजमान द. आफ्रिकेने दुस-या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर निर्णायक सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त खेळ करून द. आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव केला. यासह केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने 108 धावांची तुफानी खेळी केली. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. तिलक वर्माने 52 धावांचे योगदान दिले. याशिवाय अर्शदीप सिंगने संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याने तीन सामन्यांत 10 विकेट घेतल्या. तो प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT