Latest

Rupee | शेअर बाजार उसळला, पण रुपया गडगडला, काय कारण?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकन डॉलरला वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया ( Indian Rupee) निचांकी पातळीवर आला. आज रुपयात ३ पैशांची घसरण झाली. यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्याने ८३.४१ ही सार्वकालिक निचांका पातळी गाठली. गुंतवणूकदार आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतविषयक धोरणाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत, असे फॉरेक्स ट्रेडर्सनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

आरबीआयच्या पतविषयक धोरण समितीच्या बैठकीला बुधवारी बैठक सुरूवात होईल आणि शुक्रवारी ते व्याजदराबाबत निर्णय जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर इंटरबँक फॉरेन एक्चेंज बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.४१ च्या सर्वकालीन निचांकावर खुला झाला. आज रुपयात मागील बंदच्या तुलनेत ३ पैशांच्या घसरणीची नोंद झाली.

सोमवारी (दि.५) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.३८ वर स्थिरावला होता. काल सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला असतानाही रुपया खाली आला होता. ( Indian Rupee)

दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.०९ टक्क्यांनी घसरून १०३.६२ वर व्यवहार करत आहे. तर जागतिक ऑईल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर्स ०.०५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ७७.९९ डॉलरवर आले.

दरम्यान, शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ४६० अंकांनी वाढून ६९,३०० वर पोहोचला. तर निफ्टी १४९ अंकांनी वाढून २०,८३६ वर गेला. दोन्ही निर्देशांकांची ही विक्रमी उच्चांकी पातळी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT