Latest

Indian Football Team : फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ ९९ स्थानावर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाने आणखी एक उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय फुटबॉल संघाने फिफा क्रमवारीत सॅफ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत फिफा क्रमवारीत ९९ व्या स्थानी झेप घेतली आहे. (Indian Football Team)

भारतासह लेबनॉननेही दोन गुणांची कमाई केली आहे. परंतु, ते क्रमवारीत भारताच्या एक स्थान पाठीमागे आहेत. फिफा स्पर्धेतील कामगिरीमुळे कुवेतच्याही स्थानात सुधारणा झाली आहे. कुवेत सध्या १३७ व्या क्रमांकावर आहे. यंदाच्या सॅफ स्पर्धेतील स्पर्धात्मक दर्जा वाढावण्यासाठी लेबनॉन आणि कुवेत या पश्चिम आशियाई देशांच्या संघांना खेळवण्यात आले होते. (Indian Football Team)

९९ व्या स्थानावर झेप घेणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाच्या खात्यात १२०८.६९ गुण आहेत. १९९६ मध्ये भारताने या रँकिंगमध्ये ९४ व्या स्थानापर्यंत मजल मारली होती. १९९३ मध्येही ९९ व्या क्रमांक मिळवला होता. त्यानंतर २०१७ आणि २०१८ मध्ये ९६ वा क्रमांक होता. गेल्या महिन्यापर्यंत भारतीय संघ १०० व्या स्थानावर होता.

अर्जेंटिना पहिल्या क्रमांकावर

विश्वविजेत्या अर्जेंटिनाने फिफा क्रमवारीतील पहिले स्थान कायम राखले आहे. त्यांच्या खालोखाल फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड आणि बेल्जियम अशी क्रमवारी आहे. आशिया देशांत जपान २०, त्यानंतर इराण (२२), ऑस्ट्रेलिया (२७), कोरिया (२८) आणि सौदी अरेबिया (५४) हे आशियातील टॉपचे देश आहेत.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT