Latest

BAMCEF : जातनिहाय जनगणनेसाठी ‘बामसेफ’ची उद्या ‘भारत बंद’ची हाक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॅकवर्ड एण्ड माॅयनाॅरिटी कम्युनिटीज एम्पलाॅयीज फेडरेशन अर्थात बामसेफ संघटनेने २५ मे रोजी 'भारत बंद'चे आवाहन केले आहे. जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. ओबीसी जनगणना  करण्‍यात आलेली नाही. याविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.  यासंदर्भात ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्विट करून प्रसार केला जात आहे. 'कल भारत बंद होगा', असा ट्रेण्डही सुरू केला आहे.

याबाबत बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम म्हणाले, "आमच्या भारत बंद आंदोलनाला राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती मोर्चा आणि इतर संघटनांना पाठिंबा दिला आहे. काही लोक आमच्या आंदोलनाविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. खासकरून ओबीसी लोकांनी या आंदोलनात उतरू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत."

भारतीय युवा मोर्चाने सांगितले की, "जनगणना करताना त्यामध्ये जातींचीदेखील जनगणना केली जावी. पण, हा निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे." आंदोलनादरम्यान आणखी काही मुद्द्यांसंदर्भात बोलले जाईल. त्यामध्ये ईव्हीए मशीन वापरली जाऊ नये, जातीय जनगणना करावी, खासगी क्षेत्रांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, शेतकऱ्यांना एमएसपीची खात्री द्यावी, सीएए-एनआरसी लागू करण्यात येऊ नये, अशा मागण्यांचा यामध्‍ये समावेश असेल.

हेही वाचा :  

पाहा व्हिडीओ : गोष्ट पुण्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्याची | पाऊलखुणा पुण्याच्या

SCROLL FOR NEXT