Latest

Ind vs Eng Test : यशस्वी जैस्वालचे दमदार शतक

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जात आहे. तिसर्‍या दिवशी लंचनंतर इंग्‍लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. दुसर्‍या डावात भारताने दमदार सुरुवात केली. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने १२२ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजीत करत दमदार शतकी खेळी साकारली. त्‍याच्‍या या खेळीमुळे या सामन्‍यात भारताने  निर्णायक आघाडी घेतली आहे. ( India vs England 3rd Test Day 3 : Yashasvi Jaiswal century ) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विशाखापट्टणम कसोटीत यशस्वी जैस्वाल याने द्विशतकी खेळी साकारली हाेती.

Yashasvi Jaiswal century : जैस्वाल-शुभमनची शतकी भागीदारी

जो रूटने दुसऱ्या डावात इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला यष्टीचीत केले. रोहित 28 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. रोहितने पहिल्या डावात 131 धावा केल्या होत्या. राेहित १९ धावांवर बाद झाल्‍यानंतर जैस्‍वाल आणि शुभमन यांनी डाव सावरला. या जाेडीच्‍या शतकी भागीदारीमुळे भारताने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून दीडेश धावांचा टप्‍पा पूर्ण केला.

सिराजने घेतले ४ बळी, इंग्‍लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला

तिसर्‍या दिवशी लंचनंतर इंग्‍लडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटाेपला. पहिल्‍या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ४ बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्‍येकी दोन तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक १५३ धावा केल्‍या. कर्णधार बेन स्टोक्स याने ४१ तर ऑली पोप याने ३९ धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्‍य कोणत्‍याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. भारताने पहिल्‍याल डावात ४४५ धावांपर्यंत मजल मारली हाेती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT