Latest

India vs Australia World Cup 2023 Final | वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांत विराटने पाँटिंगला मागे टाकले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ४७ धावा काढून आउट झाला. त्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर विराट ५४ धावांवर आउट झाला. त्याचे ही वन डे मधील ७२ वे अर्धशतक आहे.

दरम्यान, विराट कोहली आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. कोहलीने ३७ डावांत वर्ल्ड कपमध्ये १,७५५ धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीने ICC विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांत रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे.

संबंधित बातम्या

सचिन तेंडूलकर ४५ डावांत २,२७८ धावांसह अव्वल स्थानी आहे. यात कोहली दुसऱ्या स्थानी आहे. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटनंतर रिकी पाँटिंग (१,७४३ धावा), रोहित शर्मा (१,५६०*), कुमार संगकारा (१,५३२ धावा) यांचा क्रमांक लागतो.

सचिन तेंडुलकरने ४५ सामन्यांत ५६.९५ च्या सरासरीने आणि ८८.९८ च्या स्ट्राइक रेटने ५ शतके आणि ११ अर्धशतकांसह २,३७८ धावा केल्या आहेत. २०११ मध्ये शेवटचा विश्वचषक खेळलेल्या पाँटिंगने ४६ सामन्यांत ४५.८६ च्या सरासरीने आणि ७९.९५ च्या स्ट्राइक रेटने ५ शतके आणि ६ अर्धशतकांसह १,७४३ धावा केल्या आहेत.

वन डे वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. उपांत्य फेरीपर्यंत कोहलीने १० डावांत ७११ धावा केल्या होत्या. त्यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडला आहे.

वन डे वर्ल्ड कप स्‍पर्धेतील ( World Cup 2023 final) अंतिम सामना आज (दि.१९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. दरम्यान, ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्‍ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्‍याने वनडेमध्‍ये ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत २,३५७ धावांचा टप्‍पा ओलांडला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT