Latest

India-Australia ODI Series : सामने कुठे खेळवले जातील? शेड्यूलपासून लाईव्हस्ट्रीमींगबद्दल सर्वकाही जाणून घ्या

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : India-Australia ODI Series: : 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. मोहालीत दोन्ही संघ आमनेसामने येतील. या मालिकेसाठी कांगारू संघ भारतात पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विमानतळावर एका सुरक्षा कर्मचा-या सोबत सेल्फी घेत तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, तसेच पोस्टद्वारे त्याने सांगितले की ऑस्ट्रेलियन संघ एकदिवसीय मालिला खेळण्यासाठी भारतात आला आहे.

1. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघ किती सामने खेळेल? (India vs Australia ODI Series)

कांगारू संघ भारत दौऱ्यावर वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषकानंतर टी-20 मालिका आयोजित केली जाईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कांगारू संघ पाच टी-20 सामने खेळणार आहे.

2. एकदिवसीय मालिका कधी खेळली जाईल?

22 सप्टेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 24 आणि तिसरा सामना 27 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. (India vs Australia ODI Series)

3. सामने कुठे खेळवले जातील? (India-Australia ODI Series)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये, दुसरा इंदूरमध्ये आणि तिसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.

4. एकदिवसीय मालिकेतील सामने किती वाजता सुरू होतील?

भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होतील.

5. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचा विक्रम कसा आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 146 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत कांगारू संघाने 82 सामने जिंकले आहेत. भारताला 54 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.

6. वनडे मालिका कोणत्या चॅनलवर पाहू शकता?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका स्पोर्ट्स 18 वाहिनीवर थेट प्रक्षेपित केली जाईल. त्याच वेळी, डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य सामना पाहू शकतील.

7. सामने कोणत्या 'ओटीटी' ॲपवर दिसणार?

चाहते जिओ सिनेमा अॅपवर एकदिवसीय मालिकेचे सामने ऑनलाइन पाहू शकणार आहेत. अॅपसह थेट वेबसाइटवरही तिन्ही सामने विनामूल्य पाहायला मिळणार आहेत. (India vs Australia ODI Series)

मालिकेसाठी दोन्ही संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला?

भारतीय संघ (पहिल्या दोन वनडेसाठी) :
केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र कृष्णा, आर आश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलियाचा संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT