पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammad Siraj ODI Rankings : वनडे वर्ल्ड कपच्या आधी टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळाली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा जगातील नंबर 1 वनडे गोलंदाज बनला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत त्याने 8 स्थानांची झेप घेतली आहे. त्याने अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकले आहे. क्रमवारीत ट्रेन्ट बोल्ट तिस-यास्थानी आहे.
आशिया चषक 2023 च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध सिराजने इतकी घातक गोलंदाजी केली की, श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत गारद झाला. सिराजने 21 धावांच्या मोबदल्यात सहा फलंदाजांना माघारी धाडून अनेक नवे विक्रम रचले. या कामगिरीचा त्याला आयसीसी क्रमवारीत जबरदस्त फायदा झाला. त्याच्या या स्पेलची जोरदार चर्चा अजूनही क्रिकेट वर्तृळात रंगलेली आहे. खरेत, सिराजने यापूर्वी मार्च 2023 मध्येही हे स्थान मिळवले होते. पण नंतर त्याला जोश हेझलवूडने मागे टाकले.
सिराजने आशिया कप स्पर्धेत 12.2 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या. ज्यामुळे त्याला ताज्या आयसीसी क्रमवारीत आठ स्थानांची झेप घेता आली. त्याने एकाचवेळी हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, रशीद खान, मिचेल स्टार्क या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले.
1. मोहम्मद सिराज (भारत) : रेटींग 694
2. जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) : रेटींग 678
3. ट्रेन्ट बोल्ट (न्यूझीलंड) : 677
4. मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान) : 657
5. राशिद खान (अफगाणिस्तान) : 655
6. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) :
दुसरीकडे, आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द सिरिज ठरलेल्या कुलदीप यादवला क्रमवारीत नुकसान झाले आहे. तो 3 स्थानांनी घसरून 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटींग 638 आहे.