Latest

India Q3 GDP : महागाईने भारताला दिला मोठा झटका; GDP मध्ये मोठी घसरण

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थविश्वातून भारतासाठी मोठी आणि धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीतील जीडीपी विकास दर ४.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्याच्या मागील तिमाहीमध्ये हा दर ६.३ टक्के इतका होता. सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेली विकास दराची आकडेवारी आणि अहवाल अर्थशास्त्रज्ज्ञांनी लावलेल्या अनुमानापेक्षा कमी आहे. (India Q3 GDP)

MoSPI ने दिलेल्या आकडेवारीनुसार Q3 2022-23 मध्ये वास्तविक जीडीपी ४०.१९ लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. तर तो क्वाटर ३ २०२१-२२ मध्ये तो ३८.५१ लाख कोटी रुपये होता. जो ४.४ टक्के इतका अधिक दाखवतो आहे. (India Q3 GDP)

सध्या जाहीर करण्यात आलेली आकडेवारी हे सुद्धा सुचित करत आहे की, चालू वर्षी जीडीपी विकास दर ७ टक्के इतका राहिल असा अंदाज बांधण्यात आला आहे. याच दरम्यान सरकारचा अंदाज असा की आर्थिक वर्ष २०२३ मध्ये नॉमिनल जीडीप १५.९ टक्क्याच्या दराने वाढेल. (India Q3 GDP)

अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणाने कठोर आर्थिक धोरण आणि उच्च व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था 4.6 टक्के दराने वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. तथापि, सरकारने जाहीर केलेला डेटा सूचित करतो की आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा मंदावली आहे आणि जागतिक आर्थिक परिस्थिती तणावपूर्ण राहिल्याने वाढीच्या मार्गावर चिंता वाढू शकते.

आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दरात झालेली घसरण मुख्यत्वे उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे आहे. यामुळे मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 11.2 टक्के दराने वाढली होती.

जीडीपी दर आरबीआयच्या अंदाजानुसारच

डिसेंबरमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2022 च्या शेवटच्या तिमाहीत 4.4 टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला होता. त्या वेळी केंद्रीय बँकेने या वर्षीचा विकास दर 6.8 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तरी जानेवारीच्या सुरुवातीला सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या GDP च्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, 2022-23 मध्ये भारताचा GDP 7 टक्क्यांनी वाढणार होती. सरकारने आज 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजाने भारताचा संपूर्ण वर्षाचा GDP वाढीचा अंदाज या वर्षासाठी 7 टक्के पर्यंत राहिल असता आहे.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT