Latest

shivani singh : राजपथावर दिसले नारीशक्तीचे सामर्थ्य ! राफेल चालवणारी शिवानी सिंह राजपथावर झळकली

अमृता चौगुले

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील पहिल्या महिला राफेल पायलट फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2022 ) भारतीय वायुसेनेच्या (IAF) राजपथावरील संचलनात सहभाग घेतला. भारतीय वायुसेनेच्या भाग असणारी ती दुसरी महिला फायटर जेट पायलट आहे. गेल्या वर्षी, फ्लाइट लेफ्टनंट भावना कांथ या IAF च्या राजपथावरील संचलनाचा भाग असणारी पहिली महिला फायटर जेट पायलट बनली. शिवांगी सिंह बनारसची आहे. 2017 मध्ये ती IAF मध्ये रुजू झाली. राफेल उड्डाण करण्यापूर्वी तिने मिग-21 बायसन विमान उडवले आहे.

शिवांगी सिंह पंजाबमधील अंबाला येथे स्थित IAF च्या गोल्डन ॲरो स्क्वॉड्रनचा एक भाग आहे. फुलवारिया परिसरात राहणारे व्यापारी कुमारेश्वर सिंह यांची ती मुलगी आहे. विज्ञान शाखेत पदवी घेत असतानाच ते एअर एनसीसीमध्ये रुजू झाली. शिवानीने प्रथम BHU येथे विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांचे आजोबाही भारतीय लष्करात होते. शिवांगी सिंह यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि तीही देशसेवेसाठी हवाई दलात दाखल झाली.

राफेल विमानांची निर्मिती फ्रान्समध्ये

राफेल लढाऊ विमानांबद्दल बोलायचे तर ते फ्रेंच कंपनी दसॉल्ट ॲव्हिएशनने बनवले आहेत. त्याची पहिली बॅच 29 जुलै 2020 रोजी आली. भारत फ्रान्सकडून ३६ विमाने खरेदी करत आहे. २०१६  मध्ये कंपनीकडून राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी करार झाला होता. आतापर्यंत 32 राफेल विमाने भारतीय वायुसेनेला देण्यात आली आहेत आणि चार या वर्षी एप्रिलपर्यंत येण्याची अपेक्षा आहे.

अनेक विमानांचे मॉडेल पाहिले

IAF चे संचलन 'Transforming the Indian Air Force for the future' या थीमवर आधारित होती. यादरम्यान राफेल लढाऊ विमान, स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि 3D सर्व्हिलन्स रडार Aslesha MK-1 यांचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. 1971 च्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानाच्या छोट्या मॉडेलचाही त्यात समावेश होता. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला, त्यामुळे बांगलादेश नावाचा वेगळा देश जन्माला आला. यासोबतच भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे Gnat विमानाचे मॉडेलही समोर आले.

हे ही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT