नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
युक्रेनवरील आक्रमणामुळे (invasion of Ukraine) अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध (heavy Western sanctions) लादलेत. याच दरम्यान भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचा विचार करत आहे. याबाबतचे वृत्त Reuters ने दोन भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर दिले आहे.
युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियाला पाश्चात्य देशांच्या निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये स्विफ्ट आंतरराष्ट्रीय पेमेंट सिस्टमवर अनेक बँकांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे रशियाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. याच दरम्यान भारत कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी रशियन ऑफर घेण्याचा विचार करत आहे.
भारत जे ८० टक्के तेल आयात करते, त्यातील सुमारे २ ते ३ टक्के तेलाचा पुरवठा रशियाकडून होतो. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकार तेल आयातीवर होणारा खर्च कमी करण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल तसेच अन्य वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
एका अधिकाऱ्याने Reuters वृत्तसंस्थेशी म्हटले आहे की, सवलतीच्या दरात वस्तू खऱेदी करताना आनंदच होईल. तसेच भारताला निर्बंधांमध्ये अडकण्याची चिंताही नाही. भारत- रशिया दरम्यान व्यापार यंत्रणा उभारण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, आज सकाळी रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता चर्चा सुरू झाली आहे. रशिया युक्रेन (russian invasion of ukraine) सोबत ठोस वाटाघाटी करण्यास तयार झाल्याने सोमवारी सकाळी कच्च्या तेलाचे (crude Oil prices) दर प्रति बॅरेल ४ डॉलरने कमी झाले. सोमवारी ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दर प्रति बॅरेल १०८.५५ डॉलर एवढा होता. अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीने २००८ नंतर प्रथमच उच्चांक गाठला होता.
हे ही वाचा :