Latest

Vijay Diwas 50th anniversary : पाकिस्‍तानच्‍या सुभेदार मेजरने सांगितले होते, भारताच्‍या विजयाचे रहस्‍य…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

१६ डिसेंबर १९७१ हा दिवस भारतीय लष्‍कराच्‍या इतिहासातील सुवर्ण पान. या दिवशी भारतीय लष्‍कराने पाकिस्‍तानला धूळ चारली होती. ३ डिसेंबर १९७१ रोजी हे युद्‍ध सुरु झाले होते. भारतीय जवानांच्‍या पराक्रमामुळेअवघ्‍या १३ दिवसांमध्‍ये पाकिस्‍तानने शरणागती पत्‍करली. (Vijay Diwas 50th anniversary ) भारताने हे युद्‍ध का जिंकले,  या प्रश्‍नाचे उत्तर तत्‍कालिन लष्‍कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांना युद्‍ध बंदी असलेल्‍या पाकिस्‍तानच्‍या सुभेदार मेजरने दिले होते. आजही 'ते' उत्तर भारतीय लष्‍कराबरोबर समस्‍त भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

Vijay Diwas 50th anniversary : नेमंक काय घडलं होतं?

बांगलादेश स्‍वतंत्र झाल्‍यानंतर भारताने १६ डिसेंबर १९७१ रोजीयुद्‍धसमाप्‍तीची घोषणा केली होती. भारताने पाकिस्‍तानच्‍या ९३,००० हजारांहून अधिक जवानांना कैद केले होते. एक दिवस पाकिस्‍तानच्‍या सुभेदार मेजर यांच्‍या छावणीमध्‍ये येण्‍याची परवानगी भारतीय अधिकार्‍यांनी मागितली. पराभवानंतरही भारतीय अधिकार्‍यांकडून मिळणारी वागणूक पाकिस्‍तानच्‍या जवानांना अनपेक्षितच होती. परवानगी कोण मागत होते? तर भारताचे तत्‍कालिन लष्‍कर प्रमुख सॅम माणेकशॉ. ते पाकिस्‍तानी युद्‍धकैद्‍यांच्‍या व्‍यवस्‍थेची पाहणी करण्‍यासाठी तेथे गेले होते. यावेळी त्‍यांनी पाकिस्‍तानच्‍या युद्‍धकैद्‍यांशी संवाद साधला. त्‍यांनीकेलेल्‍या भोजनाचा अस्‍वादही घेतला. तसेच
त्‍यांची विचारपूसही केली.

'परवानगी असेल तर काही सांगू का?'

सॅम माणेकशॉ यांनी युद्‍धकैदी छावणीला भेट देणे हा पाकिस्‍तानच्‍या जवानांसाठी एक सुखद धक्‍काच होता. या जवानांशी संवाद साधल्‍यानंतर सॅम माणेकशॉ निघाले. यावेळी पाकिस्‍तानच्‍या सुभेदार मेजर यांनी 'परवानगी असेल तर काही सांगू का?', अशी विचारणा त्‍यांच्‍याकडे केली. माणेकशॉ यांनी त्‍यांना बोलण्‍याची परवानगी दिली. त्‍यावेळी ते म्‍हणाले होते की, मला आज समजलं की भारताने हे युद्‍ध का जिंकले. भारताने हे युद्‍ध जिंकले कारण तुम्‍ही तुमच्‍या जवानांची खूपच काळजी घेता. तसेच युद्‍धकैद्‍यांनाही तुम्‍ही भेटलात. ज्‍या प्रकारे तुम्‍ही आम्‍हाला भेट दिली. आमची विचारपूस केली. तसे आमचे अधिकारीही आम्‍हाला कधीच भेटले नाहीत. ते स्‍वत:ला केवळ वरिष्‍ठ अधिकारी समजतात. भारताने आपल्‍या सारख्‍या नेतृत्‍वामुळेच हे युद्‍ध जिंकले असेही त्‍यांनी सांगितले.

१९७१चे युद्‍धावेळी तत्‍कालिक लष्‍करप्रमुख सॅम माणेकशॉ यांची कामगिरी अतुलनीय ठरली. भारताने सर्वच आघाड्यावर बाजी मारल्‍यानंतर त्‍यांनी 'शरणगती पत्‍करा, अन्‍यथा तुमचा खात्‍मा करु, असा निर्वाणीचा इशाराच पाकिस्‍तानच्‍या लष्‍कराला दिला होता. त्‍यांनी आपल्‍या लष्‍करसेवेच्‍या चार दशकांमध्‍ये पाच मोठ्या युद्‍धांमध्‍ये महत्‍वाची भूमिका पार पाडली. त्‍यामुळे देशाचे पहिले फिल्ड मार्शल होण्‍याचा बहुमान त्‍यांना मिळाला.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :

SCROLL FOR NEXT