Latest

Agni-1 Ballistic Missile : भारतातकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-१ चे यशस्वी प्रक्षेपण

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतातकडून गुरुवारी (दि.१) मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-१ (Agni-1 Ballistic Missile) ची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेने लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहेत. याद्वारे लक्ष्य अचूकपणे गाठता येते. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक मापदंडांनी यशस्वी पडताळणी करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते ए. भारतभूषण यांनी दिली.

अधिक उंचीवरून लक्ष्य गाठण्यास सक्षम (Agni-1 Ballistic Missile)

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1 जून 2023 रोजी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-1 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र खूप उंचावरून लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. या प्रक्षेपणाद्वारे, क्षेपणास्त्राच्या सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची यशस्वीपणे पडताळणी करण्यात आली.

भारताकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर काम 

भारत गेल्या दोन दशकांपासून विविध बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर काम करत आहे. याशिवाय भारत अचूकता-शक्तीवर चालणारी संरक्षण उत्पादने आणि संबंधित प्लॅटफॉर्म विकसित करण्यात गुंतलेला आहे. भारताची सामरिक क्षमता वाढवण्यावर भर आहे. या अंतर्गत भारताने 'अग्नी' मालिकेतील क्षेपणास्त्रांचे विविध प्रकार विकसित केले आहेत. (Agni-1 Ballistic Missile)

अग्नि-५ ची यशस्वी चाचणी

गेल्या डिसेंबरमध्ये भारताने अग्नी-५ या आण्विक-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली जी ५००० किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. अग्नी १ ते ४ क्षेपणास्त्रांचा पल्ला ७०० किमी ते ३,५०० किमी आहे आणि ते आधीच तैनात करण्यात आले आहेत.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT