Latest

IND vs WI 1st ODI Live : टॉस जिंकत भारताचा गोलंदाजी करण्याचा निर्णय; मुकेश कुमारचे वनडे पदार्पण

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरूध्दच्या पहिल्या वन-डे सामन्यात भारताने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस दरम्यान कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, वन-डे विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून संघाला अनेक गोष्टी आजमावायच्या आहेत. सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यामागे त्याने कोणतेही विशेष कारण सांगितले नाही. भारतीय संघ चार वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. (IND vs WI 1st ODI Live)

मुकेश कुमारचे वनडे पदार्पण

या सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार भारताकडून वन-डे पदार्पण करत आहे. या दौऱ्यावर त्याने भारताकडून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला आहे.  कसोटीनंतर आता त्याला वनडेमध्येही पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. (IND vs WI 1st ODI Live)

दोन्ही संघ :

वेस्ट इंडिज : शाई होप (कर्णधार), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाज, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, डॉमिनिक ड्रेक्स, जॅडन सील्स, गुडाकेश मोटी.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT