Latest

IND vs SA T20 Match : भारताचे सलामीवीर फलंदाजी करत असतानाचं मैदानात घुसला भलामोठा साप (Video Viral)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बारसपरा या स्टेडियमवर खेळवला जात आहे. गुवाहाटीत सुरू असलेल्या या सामन्यात आश्चर्यकारक प्रकार घडला. भारतीय संघ फलंदाजी करत असताना ८ व्या षटकात मैदानात सापाने एंट्री केली. यानंतर हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता. (IND vs SA T20 Match)

आजवर तांत्रिक अडचणींमुळे, प्रक्षेक मैदानात घुसल्याने तसेच कुत्र्याने मैदानात एंट्री केल्याने सामना अनेकदा थांबवण्यात आला होता. यावेळी, मात्र पहिल्यांच मैदानात झालेल्या सापाच्या एंट्री केल्याने सामना थांबवावा लागला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि के.एल.राहुल फलंदाजी करत होते. यावेळीचं सापाने मैदानात एंट्री केली. (IND vs SA T20 Match)

दक्षिण आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यांनतर भारताने प्रथम फलंदाजी करत २३७ धावा केल्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान ठेवले आहे. सुर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ही मोठी धावसंख्या उभी केली. (IND vs SA T20 Match)

भारताकडून सुर्यकुमार यादवने ५ चौकार आणि ५ षटकार लगावत २२ चेंडूमध्ये ६१ धावा काढल्या. तर के.एल. राहुलने ५ चौकार आणि ४ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ५७ धावा काढल्या. सुर्यकुमार यादव आणि के.एल.राहुल यांच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही २८ चेंडूमध्ये ४९ धावांची खेळी केली. (IND vs SA T20 Match)

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT