Latest

IND vs AUS Test : दुखापतीने टीम इंडिया त्रस्त, जाणून घ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणाला मिळणार संधी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी भारतीय संघाला या मालिकेत विजय मिळवणे गरजेचे आहे. पहिल्या सामन्यासाठी फक्त एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने भारतीय खेळाडू मैदानावर सराव करताना दिसत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडू कोण असतील? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. कारण भारतीय संघातील दोन प्रमुख खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (IND vs AUS Test)

'हे' दोन खेळाडू दुखापतीने त्रस्त

भारतीय संघातील दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहेत. भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा अपघात झाल्याने तो क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंत भारतीय संघासाठी 'हिरो' ठरला होता. मात्र, अपघात झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध नसेल. ऋषभ पंतशिवाय भारताचा वेगवान गोलंदाजा जसप्रीत बुमराहही दुखापतीमुळे त्रस्त आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. यानंतर जसप्रीत बुमराहला कसोटी मालिकेलाही मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (IND vs AUS Test)

अंतिम ११ मध्ये कोणाचा मिळणार संधी? (IND vs AUS Test)

सलामीवीर म्हणून शुभमन गिल आणि के.एल.राहुल या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. कारण शुभमन गिलने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तर के.एल.राहुलला अजूनही फॉर्म गवसलेला नाही. जर के.एल.राहुलला सलामीवीर म्हणून संधी मिळाली. तर शुभमन गिलला मध्यक्रमामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. (IND vs AUS Test)

ऋषभ पंत अपघातामुळे संघाबाहेर असल्यामुळे त्याच्या जागी के.एस.भरतला संधी मिळू शकते. केएस.भरतला गेल्या काही सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून अंतिम १५ मध्ये संधी मिळाली होती. जसप्रीत बुमराहच्या उपलब्ध नसल्याने भारतासाठी गोलंदाजी हा चिंतेचा विषय बनला आहे. मालिका भारतात खेळवण्यात येणार असल्याने फिरकीपटूंना मदत मिळू शकते. त्यामुळे रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनला संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (IND vs AUS Test)

पहिल्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), के.एल.राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/शुभमन गिल, केएस. भरत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव/अक्षऱ पटेल

पहिल्या सामन्यासाठी अंतिम १५ खेळाडू – रोहित शर्मा (कर्णधार), के.एल.राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,शुभमन गिल, केएस. भरत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अक्षऱ पटेल, जयदेव उनादकट, कुलदीप यादव, इशान किशन

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका (IND vs AUS Test)

पहिला सामना – ९ ते १३ फेब्रुवारी – नागपूर
दुसरा सामना – १७ ते २१ फेब्रुवारी – दिल्ली
तिसरा सामना- १ ते ५ मार्च – धर्मशाला
चौथा सामना – ९ ते १३ मार्च अहमदाबाद

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT