Latest

IND vs AUS 2nd ODI : टीम इंडियाने वन-डेमध्‍ये ऑस्ट्रेलियाविरूध्द रचली सर्वोच्च धावसंख्या, दिले ४०० धावांचे लक्ष्‍य

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने नव्‍या विक्रमाला गवसणी घातली. आजच्या सामन्यात भारताने ५ गडी गमावत ३९९ धावांची खेळी करत विक्रम रचला. भारताची यापूर्वी ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध वन-डे फॉर्मेटमधील सर्वोच्‍च धावसंख्‍या ६ बाद ३८३ होती. हा सामना २ नोव्‍हेंबर २०१३ मध्‍ये बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता. (IND vs AUS)

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ कर्णधार आहे. कांगारू संघात तीन बदल करण्यात आले आहेत, तर भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. (IND vs AUS 2nd ODI)

शुभमन- श्रेयसची धडाकेबाज शतकी खेळी

ऑस्‍ट्रेलियाने टाॅस जिंकत प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र शुभमन गिल, श्रेयस अय्‍यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. श्रेयस अय्यरने ८६ बॉलमध्ये आपले शतक केले. यामध्ये त्याने १० चौकार आणि ३ षटकार लगावले. भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने सामन्याच्या ३२ व्या ओव्हरच्या बॉलवर एकेरी धाव घेत त्याने आपले धडाकेबाज शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ९२ बॉलमध्ये १०० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले. (IND vs AUS)

केएल राहुलचे दमदार अर्धशतक

शुभमन गिल आणि श्रेयस अय्‍यर तंबूत परतल्‍यानंतर कर्णधार केएल राहुल याने इशान किशनबराेबर धावफलक हालता ठेवला. त्‍याने ३५ चेंडू मध्येआपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावले.

सूर्यकुमारचा धमाका

सुर्यकुमारने आपल्या खेळीत २५ बॉलमध्ये झंझावती अर्धशतक केले. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार लगावले. भारतीय फलंदाजांच्या धमाकेदार खेळीमुळे संघाने ऑस्ट्रेलियापुढे धावांचा डोंगर उभारला आहे.

केएल राहुल बाद

४६व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर भारताला पाचवा धक्का बसला. कर्णधार केएल राहुल ५२ धावांवर बाद झाला. त्याला कॅमेरून ग्रीनने क्लीन बोल्ड केले. राहुलने ३८ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली.

राहुलचे अर्धशतक, सूर्याची झंझावाती फलंदाजी

कर्णधार केएल राहुलने ३५ बॉलमध्येआपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावले. तो शानदार फलंदाजी करत आहे. तर इंदूरमध्ये सूर्यकुमार यादव तुफानी खेळी करत आहे, त्याने ४४ व्या षटकात कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकले. भारताने 44व्या षटकात 26 धावा केल्या.

भारताला चौथा धक्का; इशान किशन बाद

सामन्याच्या ४१ ओव्हरमध्ये भारताचा चौथा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाने इशान किशनला अॅलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद केले. किशनने १८ बॉलमध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या

श्रेयस पाठोपाठ शतकी खेळीनंतर शुभमनही आऊट

सामन्याच्या ३५ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शुभमनच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. त्याला ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज कॅमरून ग्रीनने कॅरीकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत ९७ बॉलमध्ये १०४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले.

श्रेयस पाठोपाठ शुभमनचे धडाकेबाज शतक

भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने सामन्याच्या ३२ व्या ओव्हरच्या बॉलवर एकेरी धाव घेत त्याने आपले धडाकेबाज शतक पुर्ण केले. त्याने आपल्या खेळीत ९२ बॉलमध्ये १०० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ६ चौकार आणि ४ षटकार लगावले.

धडाकेबाज शतकानंतर श्रेयस आऊट

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शुभमन-श्रेयस जोडी फोडण्यात यशस्वी ठरला. त्याने सामन्याच्या ३१ व्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरला बाद करत २०० धावांच्या भागिदारीला ब्रेक लावला. त्याने मॅथ्यू शॉर्टकरवी त्याला झेलबाद केले. श्रेयसने आपल्या शतकी खेळीत ९० बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले. (IND vs AUS 2nd ODI)

श्रेयसचे धडाकेबाज शतक

सामन्याच्या ३० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एकेरी धाव घेत श्रेयस अय्यरने ८६ बॉलमध्ये आपले शतक केले. यामध्ये त्याने १० चौकार आणि ३ षटकार लगावले.

गिल-अय्यरची 'दीडशतकी' भागिदारी

सामन्यात चौथ्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाड बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने सलामीवीर शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी केली आहे. गिल-अय्यर जोडीने १०७ बॉलमध्ये दीडशतकी भागिदारी केली. गिलने ६० बॉलमध्ये ७६ धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. तर अय्यरने आपल्या खेळीत ६१ बॉलमध्ये ७६ धावांची खेळी केली. यामध्ये ८ चौकार आणि ३ षटकार लगावले आहेत.

भारताने ओलांडला १५० धावांचा टप्पा

भारतीय फलंदाज गिल आणि अय्यर या जोडीने संघाला १५० धावांचा टप्पा पार करून दिला. यासह त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०२ बॉलमध्ये १४६ धावांची भागिदारी केली आहे.

गिल पाठोपाठ अय्यरचे धडाकेबाज अर्धशतक

शुभमन गिल पाठोपाठ श्रेयस अय्यरने सामन्यात ४१ बॉलमध्ये आपले अर्धशतक केले. यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला.

शुभमनचे धडाकेबाज अर्धशतक

सामन्याच्या १४ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्रीनला षटकार मारत आपले अर्धशतक केले. त्याने ३७ बॉलमध्ये हे अर्धशतक झळकावले. गिलने आपल्या खेळीत २ चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत.

पाऊस थांबला; सामन्याला पुन्हा सुरूवात

इंदौरमध्ये पाऊस थांबला असून स्टेडियमवरून कव्हर काढण्यात आले आहेत. पंचांनी स्टेडियमची पाहणी करून सामन्याला पुन्हा सुरूवात केली. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत. ९.५ षटकांनंतर भारताची धावसंख्या १ बाद ७९

सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वन-डे सामना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. भारताची धावसंख्या ९.५ ओव्हरमध्ये १ बाद ७९ आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर फलंदाजी करत आहेत. गिलने २७ बॉलमध्ये ३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले आहेत. तर, अय्यरने आपल्या खेळीत २० बॉलमध्ये ३४ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार लगावले आहेत. गिल-अय्यर जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३७ बॉलमध्ये ६३ धावांची भागिदारी केली आहे. (IND vs AUS 2nd ODI)

गिल-अय्यरची अर्धशतकी भागिदारी

सामन्यात चौथ्या ओव्हमध्ये ऋतुराज गायकवाड बाद झाला.यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने सलामीवीर शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली. गिल-अय्यर जोडीने २९ बॉलमध्ये अर्धशतकी भागिदारी केली.

भारताला पहिला धक्का; ऋतुराज गायकवाड बाद

सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेझलवूडने ऋतुराज गायकवाडला कॅरीकरवी झेलबाद केले. गायकवाडने आपल्या खेळीत १२ बॉलमध्ये ८ धावा केल्या.

भारत 2006 मध्ये इंदूरमध्ये पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर त्यांनी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियाने येथे सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत सर्व सामने जिंकण्यात यश आले आहे. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदाच आमनेसामने आले आहेत. 2017 मध्ये टीम इंडियाने कांगारूंचा 5 विकेट्सने पराभव केला होता.

भारत :
शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसीद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया :
डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT