Latest

Congress | लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका! I-T ने बजावली १,७०० कोटींची नोटीस

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीपूर्वी (2024 Lok Sabha elections) काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे. आयकर विभागाने काँग्रेसला १,७०० कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चार मूल्यांकन वर्षांच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका फेटाळल्यानंतर काही तासांतच ही नोटीस आली असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे वकील आणि राज्यसभा खासदार विवेक तन्खा यांनी आयकर विभागाकडून पक्षाला नोटिस आल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी आयकर विभागाची ही कारवाई अयोग्य असल्याचे सांगत त्याला कायदेशीर आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. सुमारे १,७०० कोटी रुपयांची नवीन आयकर विभागाची नोटीस मुख्य कागदपत्रांशिवाय काँग्रेसला देण्यात आल्याचा आरोप तन्खा यांनी केला आहे. "आम्हाला मूल्यांकन आदेशांशिवाय मागणी नोटीस देण्यात आली. लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसची आर्थिक गळचेपी केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

आयकर विभागाने २०१८-१९ च्या मूल्यांकन वर्षासाठी कर थकबाकी आणि व्याज म्हणून दिल्लीतील काँग्रेसच्या बँक खात्यांमधून १३५ कोटी रुपये वसूल केले आहेत.

आयकर विभागाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या काँग्रेसच्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि पुरूषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळल्‍याने काँग्रेसला मोठा धक्का बसला.

नेमकं प्रकरण काय?

आयकर विभागाने १३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसला १०५ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी नोटीस पाठवली होती. विभागाने काँग्रेसला २१० कोटींचा दंडही ठोठावला होता. यासोबतच काँग्रेसची बँक खातीही गोठवण्यात आली. आयकर विभागाच्‍या या कारवाईविरोधात काँग्रेसने याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका फेटाळण्यात आली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT