Latest

Ashadhi Wari : ‘आम्ही सिनेमातले हिरो; पण खरे हिरो वारकरी…’, स्वप्नील जोशी विठ्ठलाच्या चरणी लीन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन वर्षापासून सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदाच्या आषाढी एकादशी ( Ashadhi Wari ) वारीचा उत्सव पुन्हा एकदा उत्साहात साजरा ङेत आहे. सध्या पायी वारीने असंख्य भक्त पंधरपूरमध्ये दाखल झाले आहेत. परंतु, सामान्य माणसासोबत काही मराठी कलाकारानी देखील यंदाच्या वारीत आनंदाने सहभागी होतला आहे. यात मराठी अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेता क्षितिश दाते, अभिनेत्री दीप्ती भागवत, स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटेने मनमुराद आनंद घेतला.

अभिनेता स्वप्नील जोशीने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून पायी वारीत सहभागी झाल्याचे सांगितले. यात त्यांनी म्‍हटलं आहे की, "जय हरी विठ्ठल, #पाईवारी. काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो, अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली, कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे! बघू, पांडुरंग कधी संधी देतो; पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही, आम्ही सिनेमातले हिरो! पण खरे हिरो हे वारकरी.

वारकरी तहान भूक विसरून, पाई वारी चालतात, पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते, त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटलं, टीमने वारीमध्ये अन्नदान, बसायची, पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल हे सगळ पाहून आनंद झाला. मनोरंजन करता करता समाजसेवा करता येत आहे याचा अभिमान आहे, लिहायचं खूप आहे, शब्द सुचत नाहीत, हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी करावाच, माझी आजी म्हणायची…तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत, काल मला कळलं ती काय म्हणायची, जय हरी विठ्ठल!" अशी भल्ली मोठी पोस्ट स्वप्नीलने लिहिली आहे.

अभिनेत्री दीप्ती भागवत हिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आषाढी पायी वारीत सदभागी झाली आहे. तिने यामध्ये "यावर्षी आषाढी वारीमध्ये दिसणार चैतन्य अभूतपूर्व आहे. पायी चालताना विठ्ठल- विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम अशा नामघोषात पंढरीची वाट आता वारकरी माउलींनी धरली आहे. २२ जूनला चित्रीकरणासाठी वारीत सहभागी झाले. अनेक सहृदयींची भेट घडली. खूप छान अनुभव आलेत, वारीत चालत असताना सात महिन्यांचा एक लहानगा वारकरी माऊली हसत- हसत माझ्या कडेवर आला. त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता कुतूहल आनंद अन एका निष्ठावंत वारकऱ्यांचा पोषाख बघून हरखून गेले, वाटलं की या चेहऱ्याकडे कुणीही पाहिलं की त्याला पुन्हा- पुन्हा जगावंस वाटेल, तसंच वर्षांनुवर्षे वारी करणारे एक जेष्ठ माऊली वारी मार्गात माझ्या दिशेने आले आणि चेहऱ्यासमोर हात धरला, काही कळेना मला, हातावर काही अक्षरं होती, वाचल्यावर निःशब्द झाले, त्यांनी माझं नाव त्यांच्या हातावर लिहिलं होतं.

खूप आशीर्वाद, अशा कित्येक माऊलींनी कुणी शब्दांनी, कुणी डोक्यावर हात ठेवून, कधी डोळ्यातून व्यक्त होत मला कृतार्थ केलं. गजर कीर्तनाचा कार्यक्रमामुळे एवढं उदंड प्रेम मिळतय, हा दिव्य योग वारी पर्वात जुळून यावा हा पांडुरंगाचाचं आशीर्वाद, वारी अशीच सुरू राहील आनंदाची, जीवनाची सोबत पंढरीची, कधी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात वारीचा शेवट होईल तर कधी काळजाच्या समाधानात जीवन वारी विसावेल. उघड्या डोळ्यांत वा मिटल्या डोळ्यांत एक निस्सीम शांतता जाणवतं राहिलं. कोणत्याही प्रश्नांपलीकडची. कधी -कधी फार बोलू नयेच फक्त अनुभवावं. हृदयाच्या आतून अन डोळ्यांच्या काठून. "समाधी" नसेल तरी समाधानी करणारी एक सायुज्य शांती अनुभूतीत प्रकट होत राहील. चैतन्य प्रकाश होईन. ज्ञानाचा दिवा लागो, सत्संग सदभाव संगती जडो , सर्व जीव सुखी होवोत , शांती सर्वत्र प्रस्थापित होवो !!! इति श्री विठ्ठलार्पणमस्तु शुभम भवतु," असे तिने लिहिले आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशीने काही दिवसांपूर्वी वारीचा अनुभव घेत एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यात तिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'आजवरचा सगळ्यात भारी फोटो' असे म्हणत तिचे वारीवरचे प्रेम दिसून आले होते. याशिवाय अभिनेता क्षितिश दाते यानेही 'हरि मुखे म्हणा' या आषाढी एकादशीनिमित्त असलेल्या कार्यक्रमासाठी वारीत सहभागी झाला आहे. अभिनेता मीर परांजपे याने आषाढी एकादशीनिमित्त इन्स्टाग्रामवर एका 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' हे गाणं गातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय आषाढी वारी निमित्ताने प्रथमेश लघाटेसह अनेक कलाकारांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाटलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT