Latest

पुण्यात भाजपा आमदाराचा तोल सुटला, लगावली कर्मचाऱ्याच्या कानशिलात..

Laxman Dhenge

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात राडा झाला असून भाजप आमदार सुनील कांबळेनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातव यांच्या कानशिलात मारली आहे. उद्घाटन पाटीवर त्यांचं नाव नसल्यानं आमदार सुनील कांबळे संतप्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावली, स्टेजवरून खाली उतरताना आमदार सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ फुटेज व्हायरल होत आहे.

यादरम्यान सुनील कांबळे मात्र आपण मारहाण केली नसल्याचं सांगत आहेत. परंतु व्हिडीओमध्ये सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आह. आपण कोणालाही मारहाण केली नाही, केवळ त्या कर्मचाऱ्याला बाजूला केलं, असं आमदार कांबळे यांनी म्हटलं आहे. राग इथल्या प्रशासनावर होता, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराज होतो, असं ते म्हणाले.

"मी समोरुन स्टेजवरुन उतरत असताना तो आडवा आला, मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि तिथून लगेच निघालो. वाद झाला असता, मारहाण करायची असती त्याला, तर तिथे थांबलो असतो. मी बाजूला आलो.", असं कांबळे म्हणाले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांबाबत विचारल्यावर सुनील कांबळे म्हणाले की, "तुम्ही नीट पाहा, मी काही पाहिलेलं नाही, तुम्ही बघा खात्री करा. मारहाण करायची किंवा कानशीलात मारण्याची काय पोझिशन असते, ते नीट पाहा."

"कोणीही आरोप केला असेल, पण मी त्यांना ओळखत नाही आणि ते मला ओळखत नाही. रुपाली चाकणकरांसोबत मी चालत होतो, त्यावेळी त्यांनी म्हटलं अरे आमदारांना पुढे जाऊ द्यात. तरी ते धक्का मारत होते, तिथे जे पोलीस होते त्यांनी बाजूला नेलं खाली त्यांचं जिन्यात काय झालं मला नाही माहिती, मी कार्यक्रमात निघून गेलो.", असंही सुनील कांबळे म्हणाले. "राग प्रशासनावर काढायचा होता तर तो पत्रकारांशी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी काढण्याचा संबंध काय? मी कलेक्टरांशी बोललो, स्थानिक आमदार म्हणून कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं नाराजी होती.", असं ते म्हणाले.

नेमकं घडलय काय??

पुण्यात अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला भाजपच्या आदाराने कानशीलात लगावली. ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाची पत्रिका अथवा बोर्डावर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली. जितेंद्र सातव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैदकीय पक्षाच्या केंद्राचे प्रमुख आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्येच सुनील कांबळे यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावल्याचं समोर समोर आलं आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT