Latest

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

करण शिंदे

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल, राज्य राखीव दल आणि केंद्रीय राखीव दलाच्या वतीने पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गावामधून जवानांनी सशस्त्रासह पथसंचलन केले.

पोलीस स्टेशनपासून इंदिरानगर-संजयनगर-रामनगर-सामोरे, चौफुली सटाणा रोड, एखंडे वाडा-गोपाळ नगर-नाना चौक-मुख्य बाजारपेठ-खोल गल्ली-विश्वनाथ चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत अशा मार्गावरून हे पथसंचालन करण्यात आले. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचालन करण्यात आले.

निवडणुकीमध्ये मतदानच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी सशस्त्रासह गावातून पथ संचालन केले. यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस दलाचाही यामध्ये समावेश होता.

या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, उपनिरीक्षक भूषण शेवाळे, विजय चौरे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पथसंचलनात राज्य राखीव दलाचे तीन अधिकारी 65 जवान, बीआयएफचे एक अधिकारी आणि 39 जवान तर बीएसएफचे दोन अधिकारी 48 जवान यांच्यासह पिंपळनेर पोलीसांचा समावेश होता. केंद्रीय राखीव दलाचे सशस्त्र जवान तर चार अधिकारी सहभागी होते. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळात कोणतेही गालबोट लागू नये, यासाठीची ही पथसंचलनाची तयारी केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT