Latest

China : चीनमध्ये लोकांचा राग होतोय अनावर; शी जिनपिंग संकटाच्या जाळ्यात

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुन्हा एकदा कोरोना विषाणुच्या वाढल्या संसर्गामुळे चीनच्या (China) कम्युनिस्ट पार्टी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे कोरोना संक्रमित परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकार धडपडावं लागत आहे, तर दुसरीकडे सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात चीनी लोकांच्यात असंतोष वाढत आहे.

लाॅकडाऊनला नागरिकांचा तीव्र विराेध

कोरोनाचे वाढतं संक्रमण पाहता शांघाईमध्ये सरकारने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याला लोकांकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. चीनमधील सध्याची परिस्थिती अशी आहे की, हुकुमशाहीसारखी वागणूक देणारी सरकार आता लोकांना सहकार्य करण्याची विनंती करताना दिसत आहे.

राष्ट्रपती शी जिनपिंग (China) यांच्या झिरो कोविड पाॅलिसीचे लोकांनी समर्थन करावं, असे आवाहन कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने केलेले आहे. तसेच सरकार सांगण्यात आलं आहे की, शांघाई आणि इतर ठिकाणी लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरी सरकारच्या पाॅलिसीमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कारण, कोरोना संसर्गावर नियंत्रण करण्याला प्राथमिकता देण्यात आली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, 'पिपुल्स डेली'ने सोमवारी सांगितले की, कोरोना विषाणुच्या वाढत्या संक्रमणासंदर्भात राष्ट्रपतींनी आखलेली रणनिती योग्य आणि प्रभावी ठरलेली आहे. त्यामुळे चीन जनतेने झी जिनपिंग यांच्याबरोबर रहावं. इतकंच नाही तर संबंधित वृत्तपत्राने असंही सांगितलं आहे की, नागरिकांनी नियम आणि उपायांचे पालन करावे.

पिपुल्स डेलीने पुढे असं म्हटलं आहे की, "सध्या कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवणं कठीण आहे. मागील दोन वर्षांपासून आलेल्या अनुभवाने सिद्ध झालं आहे की, कोरोनाचं संक्रमणावरील नियंत्रण हे योग्य रणनिती आणि योग्य धोरण आखल्यामुळे शक्य झाले आहे. शी जिनपिंगच्या झिरो कोविड पाॅलिसीचा पुरस्कार करताना पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आले आहे की, ही पाॅलिसी जीव वाचविण्यासाठी आणि अर्थव्यवस्था योग्य स्थितीत ठेवण्यासाठी महत्वाची आहे."

पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाची संक्रमण वाढत आहे. त्यामुळे अर्थशास्त्रावर त्याचा थेट परिणाम होत आहे. अशा परिस्थिती राष्ट्रपती शी जिनपिंग दुहेरी आव्हान सांभाळत आहेत. एकीकडे देशाच्या अर्थव्यवस्था वाचवायची आहे आणि दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला तोंड द्यायचं आहे. शांघाई आणि जिलीन प्रांतातील लोकांना घरातून बाहेर येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे लोक शी जिनपिंग आणि तेथील सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात सरकारविरोधात वातावरण होत आहे.

SCROLL FOR NEXT