Latest

उत्तर प्रदेशसाठी बैठका सुरु असतानाच भाजप मुख्यालयात ४० कर्मचारी कोरोनाबाधित सापडले !

गणेश सोनवणे

दिल्ली: पुढारी वृत्तसेवा

भारतात कोरोना व्हायरस अधिक वेगावे पसरत असून,  दिल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथील भाजप मुख्यालयात ४० कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक होती. बैठक होण्याआधी सर्व कर्मचा-यांची तपासणी केली असता, त्यात ४० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील बहुतांश जण हे सफाई कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्या सर्वांना विलगीकरण कक्षात राहण्यास सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर मध्य दिल्ली येथे मिंटो रोडवर असलेल्या भाजपा मुख्यालयाची पूर्णपणे साफसफाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापुढे, कोणतीही बैठक घेण्यापूर्वी मुख्यालयातील सर्व कर्मचा-यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. सध्या कार्यालयाशी संबधित अतिमहत्वाच्या व्यक्तीनाच कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.

हे ही वाचलं का ?

पहा व्हडिओ :

माकडाच्या मृत्यूनंतर मुंडन अन्‌ तेराव्याला भोजन, १५०० लोकांची गर्दी |

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT