Latest

Maratha Reservation : वेळ वाढवून दिली तर सरसकट आरक्षण देणार का? जरांगेंचा सरकारला सवाल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारला अजून किती वेळ हवा आहे, हे सरकारने स्पष्ट करावे. वेळ वाढवून दिली तर मराठ्यांना सरसकट आरक्षण देणार का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केला आहे. सरकारला बोलावलं होतं पण चर्चेला आले नाहीत. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या : 

मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरल्याने राज्यभर हिंसक आंदोलन सुरु आहेत. तसेच मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे आठव्या दिवशीही उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षण प्रश्नी जर आज काही तोडगा न निघाल्यास उद्यापासून पाणीत्याग करण्याचा निर्णय जरांगे- पाटील यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर सरकारला थोडा वेळ द्यावा लागेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

निर्णयासाठी सरकारला थोडा वेळ द्या : मुख्यमंत्री शिंदे

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची तसेच सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. कायद्याच्या बैठकीत बसणारे आणि टिकणारे आणि इतर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यावर बैठकीत चर्चा झाली. पण यावर सरकारला थोडा वेळ द्यावा लागेल, असा सूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT