

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेली संचारबंदी बुधवारी (दि.१) सायंकाळी ५ वा. पासून शिथील करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जारी केले.
सर्वच शाळांमध्ये प्रथम सत्र परिक्षा सुरु आहेत. त्यातच शेजारच्या बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातही संचारबंदी जाहीर करण्यात आली. यामुळे मंगळवारी पूर्ण दिवस सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. शाळा, महाविद्यालयेही बंद राहिली. परिस्थिती निवळत असल्याने बुधवारी सायंकाळी ५ वा. पासून संचारबंदी शिथील केल्याचे डॉ. ओम्बासे यांनी एका आदेशाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :